मारेगाव तालुक्यात अवतरले वाघोबा

दांडगावच्या जुन्या रिठावर वाघाचे ठसे व दर्शन

    दिनांक :25-Mar-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
मारेगाव, 
Maregaon-tiger : मारेगाव तालुक्यात पुन्हा वाघोबाचे आगमन झाले असून दांडगावच्या जुन्या रिठावर वाघाचे ठसे आढळून आले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीकाठावरच्या शेतकèयांना आता शेतात जायचे कसे आणि ओलितातील पीक काढायचे कसे असा प्रश्न पडला आहे.
 
 
 
tiger
 
 
 
तालुक्यातील वर्धा नदीकाठावर असलेल्या दांडगाव जुन्या रिठावर मंगळवार, 25 मार्च रोजी सकाळी विशाल सुभाष भुसारी या शेतकèयाला वाघ दिसला. त्याने गृहरक्षक नरेंद्र गजानन चिंचोलकर यांना गावात येऊन वाघ असल्याचे सांगितले. त्या दोघांनी जाऊन वाघाच्या पायाचे ठसे मोबाईलमध्ये टिपले.
 
 
वाघ जुन्या गावात असल्याने गावकèयांचा चांगलाच थरकाप उडाला आहे. वरोरा मार्गावर हा दांडगाव येथील जुना रिठ असल्याने या रस्त्याने रहदारी मोठ्या प्रमाणात असते. याच मार्गावर वाघाचे अस्तित्व असल्याने नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. गावकèयांनी लागलीच ही माहिती वन अधिकाèयांना दिली. वनविभागाची चमू त्या परिसरात वाघाचा शोध घेण्याकरिता पोचली आहे.
लोकांनी सतर्क रहावे
 
वनविभागाची चमू दांडगाव परिसरात पोहचली असून प्रथमदर्शी वाघाचेच ठसे असल्याचे निष्पन्न होत आहे. परिसरात वनविभागाकडून कॅमेरे लावले जात आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे. वरिष्ठांना कळवून वाघाचा शोध घेतला जात आहे.
शंकर हटकर
वनपरिक्षेत्र अधिकारी, मारेगाव