नागपूर,
Nagpur News : जंगलातील वणवा प्रतिबंधक आणि व्यवस्थापन धाेरणांच्या आखणीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय (एनएफएससी) आणि चंद्रपूर वन प्रशासन, विकास आणि व्यवस्थापन अकादमी (सीए\ए) यांच्यात साेमवारी सामंजस्य करार (एमओयू) झाला.
एनए\एससीचे संचालक एन. बी. शिंगणे आणि सीएफएचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यावेळी नागपूरचे उपवनसंरक्षक (ए\आर) उमेश वर्मा, एनए\एससीच्या समन्वयक आणि सहाय्यक संचालक वैशाली सिंग, सहाय्यक संचालक गगन उपाध्याय आणि सहाय्यक संचालक धर्मेंद्र पाल यांची यावेळी प्रमुख उपस्थिती हाेती.
या सामजंस्य कराराचा प्रमुख उद्देश जंगलातील वणवा प्रतिबंधन, व्यवस्थापन आणि प्रतिसाद या महत्त्वाच्या क्षेत्रात प्रशिक्षण, काैशल्याची देवाणघेवाण आणि संशाेधन कार्यक्रमांना बळकटी देणे आहे, असे एन. बी. शिंगणे यांनी सांगितले. या करारामुळे वणवा नियंत्रणासाठी नाविन्यपूर्ण तंत्रे आणि सर्वाेत्तम पद्धतींवर लक्ष केंद्रित करून संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा आणि संशाेधन प्रकल्प सुलभ करण्यात येणार आहे. यामुळे दाेन्ही संस्थांची तयारी आणि प्रतिसाद क्षमता वाढेल, ज्यामुळे वनसंपत्ती आणि जैवविविधतेचे चांगले संरक्षण हाेईलख् अशी अपेक्षा आहे, असे श्रीनिवास रेड्डी यांनी सांगितले.