शेतकर्‍यांना आत्महत्या नव्हे तर आत्मनिर्भरतेची गरज

डॉ. राजाराम त्रिपाठी यांचे प्रतिपादन

    दिनांक :26-Mar-2025
Total Views |
गोंदिया, 
Farmers विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे, तेथे आता नवी कृषी क्रांती घडणार आहे. माँ दंतेश्वरी हर्बल फार्ममध्ये विकसित ‘कोंडागाव मॉडेल’ हे देशातील सर्वात यशस्वी कृषी नवोन्मेष मॉडेल आहे, हे मॉडेल आता विदर्भात लागू केले जाईल. विदर्भातील शेतकर्‍यांना आत्महत्या नव्हे, तर आत्मनिर्भरतेची गरज अस्ल्याचे मत अखिल भारतीय किसान महासंघाचे राष्ट्रीय संयोजक तथा सर्वश्रेष्ठ शेतकरी हा संमान प्राप्त करणारे उच्च शिक्षीत व प्रगतिशिल शेतकरी डॉ. राजाराम त्रिपाठी यांनी केले. ते येथील भवभूती रंगमंदिर येथे 23 मार्च रोजी आयोजित सुपर वूमन्स पुरस्कार वितरण कार्यक्रमात अतिथी म्हणून बोलत होते.
 
 
फार्मर
 
 
त्रिपाठी पुढे म्हणाले, बहुतांश पिकांना विदर्भातील वातावरण पोषक आहे. या प्रदेशाला नवीनतम कृषी प्रयोगांची भूमी बनवण्याचा निर्णय घेतला आहे. कोंडागाव मॉडेल, कमी खर्च, जास्त उत्पन्न आणि हवामान संकटावर एक उपाय आहे. मॉडेलअंतर्गत ऑस्ट्रेलियन काळी मिरी, हळद, मूसली, स्टीविया आणि इतर औषधी पिकांचे मिश्रित लागवड केली जाते. विशेषतः झाडांपासून तयार केलेल्या नैसर्गिक ग्रीनहाऊस प्रणालीबद्दल सांगून हे मॉडेल अवलंबल्यास शेतकरी 3 ते 4 पट उत्पन्न वाढवू शकतात. हे मॉडेल जैविक खताच्या निर्मितीस मदत करते आणि मोठ्या प्रमाणावर जलसंधारण देखील करत असल्याचे ते म्हणाले. यावेळी समाजसेवा, शिक्षण, आरोग्य, साहित्य आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या सविता विनोद अग्रवाल, पिंकी पारस कटकवार, सविता संजय पुराम, कल्याणी मोहरे (सरिता सरोज), यशोधरा सोनवणे, रजनी रामटेके, डॉ. शीतल रामादे, शालिनी बडोले, शालू कोल्हे, वर्षा बडगुजर आणि लता बाजपेयी यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी घेण्यात आलेल्या सोलो डान्स स्पर्धेत प्रथम एकता तिवारी, द्वितीय मनीषा माहुरे आणि तृतीय रोहिणी तोमर यांनी स्थान मिळवले. ड्युएट डान्स प्रकारात पूजा मोहितकर-मंजू पटले यांनी प्रथम, मोनिका पटले-रामेश्वरी पटले यांनी द्वितीय आणि स्वेता बनकर-रीना बनकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. लोकनृत्य स्पर्धेत शबनम पठाण व त्यांच्या चमूनू ग्रुप डान्समध्ये प्रथम आणि झूलेलाल ग्रुपने द्वितीय स्थान मिळवले. डान्स स्पर्धेचे परीक्षण उन्नती बुराडे आणि अस्मिता गुप्ता यांनी केले.Farmers यावेळी डॉ. त्रिपाठी यांचा नागरी संमान करण्यात आला. कार्यक्रमाला वरिष्ठ समाजसेवक मनीष श्रीवास्तव, युवा उद्योजक प्रीतेश शुक्ला, गोंदिया पब्लिक स्कूलच्या संचालिका डॉ. इंदिरा सपाटे, महिला अर्बन बँकेच्या संचालिका डॉ. माधुरी नासरे, ज्येष्ठ समाजसेवक लक्ष्मण गुडधे, समाजसेविका सीमा डोये, सुपर वूमन ग्रुपचे संचालक प्रमोद गुडधे, समाजसेवक विवान मिश्रा, सुपर वूमन कार्यक्रम आयोजक प्राची गुडधे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन याशिका धामडे, नेहा पारधी यांनी केले. आभार संध्या डोंगरवार यांनी मानले.