Clean the table fan टेबल फॅन हा घरोघरी वापरला जाणारा एक महत्त्वाचा उपकरण आहे. तो पोर्टेबल असल्याने सहज कुठेही हलवता येतो आणि कमी जागेत बसतो. मात्र, या फॅनची स्वच्छता राखणे मोठे आव्हान असते. विशेषतः जाळी बंद असल्यामुळे ती न उघडता धूळ काढणे कठीण होते.
मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका भन्नाट युक्तीच्या मदतीने तुम्ही टेबल फॅन फक्त ५ मिनिटांत स्वच्छ करू शकता, तीही जाळी न उघडता!
ही युक्ती कशी वापरायची?
साहित्य:
भांडी धुण्याचे द्रव (डिशवॉश लिक्विड)
गरम पाणी (अत्यंत गरम नसावे)
पांढरा व्हिनेगर
पॉलीथिन कव्हर
स्प्रे बाटली
जुन्या वर्तमानपत्राची चादर किंवा टाकाऊ कागद
प्रक्रिया:
1. क्लिनर तयार करा: स्प्रे बाटलीत डिशवॉश लिक्विड, गरम पाणी आणि पांढरा व्हिनेगर मिसळा.
2. पंख्याखाली कागद अंथरा: जेणेकरून धूळ जमिनीवर न पडता त्यावर गोळा होईल.
3. फॅनवर फवारणी करा: या तयार क्लिनरची पंख्याच्या जाळीवर फवारणी करा.
4. पंख्याला कव्हर घाला: फॅनला पूर्णपणे पॉलीथिनने झाकून टाका.
5. पंखा चालू करा: आता पंखा पूर्ण वेगाने चालू करा. यामुळे पंख्यातील धूळ वेगाने निघून जाईल आणि पंखा स्वच्छ होईल.
ही युक्ती अत्यंत सोपी आणि प्रभावी असून कोणत्याही मेहनतीशिवाय टेबल फॅन स्वच्छ आणि नवीनसारखा दिसेल. एकदा हे करून पाहा आणि फरक स्वतः अनुभवा!