नागपूर,
Shri Ram Janmotsav : जयप्रकाश नगर येथील श्रीराम मंदिरात ३० मार्च ते ६ एप्रिल दरम्यान श्रीराम जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर हनुमान जन्मोत्सव सोमवार, ७ एप्रिल ते शनिवार १२ एप्रिल दरम्यान साजरा येणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदेला सकाळी ७.३० वाजता घटस्थापना रेणुका व प्रशांत माधव शास्त्री यांचे हस्ते होईल. तर सायंकाळी ७ वा.डॉ. मिलिंद कुलकर्णी यांचे टाळी वाजवावी गुढी उभारावी , या विषयावर आयोजित केले आहे. सोमवार, ३१मार्च रोजी सकाळी ८ वा. रामरक्षा हवन सुप्रीता व विवेक आठवले यांच्या हस्ते होईल. याप्रसंगी भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तर सायंकाळी ६ ते ८.३० वा. पर्यंत डोंबिवली ठाण्याच्या अलका मुतालिक यांची रामकथा होईल. याशिवाय शुक्रवार ४ एप्रिल रोजी दुपारी ४ वा. मैत्रेय भजन भजन होईल.
तसेच कालिंदी पूरी यांचे रामजन्माचे कीर्तन आयोजित करण्यात आले असून भाविकांनी सर्व कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. हनुमान जन्मोत्सव निमित्त ७ एप्रिल रोजी महिला व पुरुषांकरिता सायंकाळी ७ ते ८.३० पर्यंत भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय पाठांतर स्पर्धा होईल. ८एप्रिल रोजी ७ ते ९ दरम्यान अभंग ९एप्रिल रोजी वागेश्वरी संगीत विद्यालयाच्या मोनाली परसोडकर यांचे भक्तिसंध्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार १०एप्रिल रोजी ९ ते १० आणि ११ ते १५ या वयोगटातील मुलामुलीं करिता रामायणातील प्रसंग या विषयावर ड्रॉइंग स्पर्धा आयोजित केलेली आहे. ११ एप्रिल रोजी श्री वेंकटेश स्तोत्र पठण आणि विचार कार्यक्रम आयोजित केला शनिवार १२एप्रिल रोजी सकाळी ५.३० वाजता हनुमान जन्माचे भजन आणि रामरक्षा, हनुमान चालीसा व आरती झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल.