शहरात मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू

कर वसुलीसाठी मनपाची धडक मोहीम

    दिनांक :28-Mar-2025
Total Views |
अमरावती, 
Property seizure action : थकित मालमत्ता कर प्रकरणी महापालिकेने मालमत्तांची जप्ती करण्याची कारवाई सुरू केली असून थकित मालमत्ता कर वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली आहे. शुक्रवारी महापालिकेच्या राजापेठ झोनमधील कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने या कारवाईस सुरवात करण्यात आली आहे.
 
 
AMT
 
 
 
विविध सुट योजना देऊनही काही थकबाकीदार मालमत्ता कराचा भरणा करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यांच्यावर ही धडक जप्ती मोहीम राबविण्यात येत आहे. मालमत्ता कराच्या वसुलीसाठी २८ मार्च रोजी सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी नर्मदा चव्हाण यांच्या नेतृत्वात मनपा मध्य झोनच्या पथकामार्फत १ लाख ४५ हजार ३६७ रुपये थकित कर असलेल्य मालमत्तेवर जप्ती व सीलची कारवाई करण्यात आली.
 
 
या पुढेही थकित कराच्या वसुलीसाठी नियुक्त पथकामार्फत जप्तीची कारवाई करण्यात येणार असून या अंतर्गत मालमत्ता सील करणे, आटकाव करणे इत्यादी कारवाई करण्यात येणार आहे. मालमत्ता जप्त किंवा सील करून मुदतीमध्ये मालमत्ताधारकांनी कर भरणा न केल्यास अशा मालमत्ताधारकांच्या मालमत्तेचा लिलाव, विक्री करून कर वसूल करण्यात येणार आहे. व्याज, शास्ती माफी योजनेचा लाभ घेऊन आपल्याकडे देय असलेल्या कराचा भरणा करावा व जप्तीसारखी कटू कार्यवाही टाळावी, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी केले आहे. या कारवाईत निरीक्षक गजेंद्र हर्षे, मालमत्ता कर वसुली लिपिक रोशन चव्हाण, धरम बिवाड, समय दुलगज सहभागी होते.