न्यायालयाच्या आदेशाने राळेगावात ‘अतिक्रमण हटाव मोहीम’ सुरू

    दिनांक :28-Mar-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
राळेगाव, 
Ralegaon encroachment : शहरातील दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण अखेर हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली. बसस्थानकाच्या मुख्य रस्त्यावर असलेले सर्व अतिक्रमण हटवण्याच्या प्रशासनाच्या निर्णया नुसार शुक्रवार, 28 मार्च रोजी पहिल्या टप्प्यात बसस्थानक चौकातील अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवण्यात आली.
 
 
 
y28Mar-Atikraman
 
 
 
मुख्याधिकारी गिरीश पारेकर यांच्या माहितीनुसार, अतिक्रमण हटवण्याचे काम टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरभर होणार आहे. या मोहिमेत पोलिस निरीक्षक सीताराम मेहत्रे, न पं कर्मचारी व पोलिस प्रशासनाच्या मार्गदर्शनात अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू आहे.
 
 
शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमणामुळे नागरिकांना वाहतूक कोंडी, अपघात आणि आग यांसारख्या घटनांना सामोरे जावे लागत होते. अनेक वर्षांपासूनच्या या प्रलंबित समस्येवर प्रशासनाने शेवटी कडक भूमिका घेतली आहे.
 
 
न्यायालयाच्या आदेशानंतरच ही कारवाई होत असून नगरपंचायतने अंमलबजावणी सुरू केली हे उल्लेखनीय. मात्र, ही मोहीम अशीच सुरू राहील का, राजकीय हस्तक्षेपातून ती थांबणार तर नाही ना, शहर अतिक्रमणमुक्त होऊन नागरिकांना मोकळा श्वास घेता येईल का, असे अनेक प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहेत.