Wallpaper घराला आकर्षक आणि ट्रेंडी लूक देण्यासाठी अनेक लोक वॉलपेपरचा पर्याय निवडतात. हे केवळ भिंतींना सुंदर बनवतातच, पण त्यांची देखभाल योग्य प्रकारे केल्यास अनेक वर्षे टिकतात. मात्र, योग्य काळजी घेतली नाही तर वॉलपेपर लवकर खराब होऊ शकतो. त्यामुळेच वॉलपेपरची दीर्घकाळ टिकवण्यासाठी आणि त्यांचा चमकदार लूक कायम ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स जाणून घेणे गरजेचे आहे.
धूळ आणि घाण दूर करण्यासाठी नियमित स्वच्छता गरजेची
वॉलपेपरवर धूळ जमा होऊ नये यासाठी आठवड्यातून किमान एकदा मऊ कापड, मायक्रोफायबर डस्टर किंवा व्हॅक्यूम क्लिनरने स्वच्छता करावी. वॉलपेपरच्या कोपऱ्यात धूळ जमा झाल्यास ती व्हॅक्यूम क्लिनरच्या ब्रश अटॅचमेंटने सहज काढता येते. हे केल्याने वॉलपेपर स्वच्छ आणि नव्यासारखा दिसतो.कधी कधी वॉलपेपरवर शाई, तेल किंवा ग्रीसचे डाग पडतात, जे कोरड्या कापडाने स्वच्छ करणे कठीण असते. अशावेळी मऊ स्पंज, थोडासा डिशवॉश साबण आणि कोमट पाणी वापरावे. मात्र, साफ करण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे.
डाग स्वच्छ करण्याची पद्धत:
1. एका भांड्यात कोमट पाण्यात थोडेसे डिशवॉश साबण मिसळा.
2. मऊ स्पंज किंवा कापड द्रावणात बुडवून ओलसर करा.
3. वॉलपेपर हलक्या हाताने स्वच्छ करा, घासू नका.
4. स्वच्छ पाण्याने ओलसर केलेल्या कापडाने पुन्हा पुसून घ्या.
5. नंतर कोरड्या कापडाने वॉलपेपर पुसून घ्या.
ग्रीसच्या डागांसाठी टॅल्कम पावडरचा वापर
भिंतीवरील ग्रीस किंवा तेलाचे डाग काढण्यासाठी टॅल्कम पावडर अत्यंत उपयुक्त ठरते.
1. डागावर कागदी टॉवेल ठेवा.
2. एका वॉशक्लोथवर टॅल्कम पावडर टाका आणि भिंतीवर लावा.
3. १० मिनिटांनंतर कोरड्या स्पंज किंवा ब्रशने पावडर साफ करा.
4. यामुळे वॉलपेपरवरील तेलकट डाग सहज निघून जातात.
सूर्यप्रकाश आणि ओलाव्यापासून संरक्षण आवश्यक
थेट सूर्यप्रकाशामुळे वॉलपेपरची चमक कमी होऊ शकते. त्यामुळे खिडक्यांवर पडदे वापरणे फायद्याचे ठरेल.
वॉलपेपर स्वच्छ करताना जास्त पाणी टाकू नका, कारण त्यामुळे ते लवकर खराब होऊ शकतात.
जर वॉलपेपरच्या कडा सुटू लागल्या तर वेळेत दुरुस्ती करावी.
वॉलपेपर स्वच्छ करताना कठोर रसायने किंवा हार्ड क्लिनरचा वापर टाळावा.
योग्य काळजी घेतल्यास वॉलपेपर राहतील टिकाऊ आणि आकर्षक
घराला नवीन लूक देण्यासाठी वॉलपेपर हा उत्तम पर्याय आहे, मात्र त्यांची योग्य देखभाल करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. वरील उपायांचा अवलंब केल्यास वॉलपेपर वर्षानुवर्षे टिकतील आणि तुमच्या घराचा सौंदर्यही वाढेल. त्यामुळे, तुम्ही जर वॉलपेपरचा विचार करत असाल किं