ऑनलाईन जुगारावर छापा, १ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त

28 Mar 2025 19:59:56
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
Online Gambling : स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने अवैध व्यवसायांवर कारवाईची मोहीम मोहीम राबवित असताना बोरगाव (मेघे) येथे सुरू असलेल्या दोन ऑनलाइन जुगारावर छापा टाकूण १ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून रवींद्र दरवरे (५२) आणि मनोहर चंदनमाथे (६२) दोन्ही रा. बोरगाव (मेघे) यांना अटक केली तर सतीश सरपटे रा. शेगाव, राजू वाहने रा. अमरावती आणि पिंटू ठाकूर रा. शेगाव हे पसार झाले.
 
 
gamble
 
 
 
गोल्डन व राजश्री या नावाच्या अ‍ॅपवर ऑनलाईन आकड्यांचा जुगार लावून लोकांना जास्त पैशाची आमिष दाखवून स्वतःचे फायद्याकरिता ऑनलाईन जुगार खेळत असल्याची माहिती दिली. त्यांच्या ताब्यातून संगणक, प्रिंटर, स्कॅनर, की बोर्ड, सीसीटीव्ही कॅमेरा, रोख, असा १ लाख ४६ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ऑनलाइन जुगार मालकाला परवाना बाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणताही शासकीय परवाना नाही असे सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला.
 
 
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, पोलिस हवालदार गजानन लामसे, सचिन इंगोले, शेखर डोंगरे, प्रमोद पिसे, भूषण निघोट, रितेश शर्मा, अमोल नगराळे, सुगम चौधरी, विकास मुंढे, गोपाल बावनकर आदींनी केली.
Powered By Sangraha 9.0