मुहूर्तावर सोने खरेदी एसआयपीच : ढोमणे

* लग्न सिझनमध्ये होणार लाख मोलाचे

    दिनांक :29-Mar-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
Saurabh Dhomane : प्रत्येकच धर्मामध्ये वेळेला महत्त्व आहे. साधरणत: सण, उत्सव साजरे करताना मुहूर्त, वेळ पाळल्या जाते. हिंदूंमध्ये साडे तीन मुहूर्तांला अजूनच महत्त्व आहे. या दिवशी मुहूर्त पाहण्याची गरज नाही एवढे हे साडे तीन दिवस पवित्र आहेत. या साडे तीन मुहूर्तांवर सोने खरेदी करावी त्यामुळे समृद्धी येते असे आपल्या पुर्वजांनी सांगितले. मुहूर्तावर केलेली खरेदी ही आजच्या भाषेत एसआयपीच ठरली आहे. गुढीपाडव्याच्या पुर्वसंध्येला ८९ हजार १५० रुपये सोन्याचे दर होते. लग्न सिझनमध्ये सोने लाखमोलाचे होण्याची शक्यता असल्याची माहिती वर्धेतील मनोहर तुकाराम ढोमणे ज्वेलर्सचे संचालक सौरभ ढोमणे यांनी दिली.
 
 
 
dhommane
 
 
बँका किंवा इतर गुंतवणुकीच्या कितीही योजना आल्यातरी महिलांचा कल आजही सोन्याकडेच आहे. सोन्याचे दागिणे हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. हेच दागिणे वेळेवर पैसा उभा करण्याची हिम्मत देते. प्रत्येक घरात सोन्याला प्रचंड महत्त्व आहे. साधारणत: उन्हाळ्यात घरात होणार्‍या लग्न कार्यासाठी गुढीपाडव्याला सोने खरेदी केली जाते. त्याच प्रमाणे साडे तीन मुहूर्तावर कमी अधिक प्रमाणात का होईना पण अनेक परिवार हमखास सोने खरेदी करतात, अशी माहिती ढोमणे यांनी दिली.
 
 
सोन्याचे भाव कितीही वाढले तरी सोने खरेदी झाल्या शिवाय राहत नाही. गेल्या एक वर्षात सोन्याच्या भावात ३० टक्के वाढ झाली. आज २९ रोजी सोन्याचा भाव प्रति तोळा ८९ हजार १५० आहे. जीएसटीसोबत तोच भाव ९२ हजारापर्यंत जात असल्याने सोन्याची १ लाखाकडे वाटचाल सुरू झाली असुन याच उन्हाळ्यात १ लाख रुपये तोळा सोने झाल्यास नवल वाटायला नको, असे त्यांनी सांगितले. कोरोनानंतरच्या काळात ४० हजार असलेले सोने आता ९० हजाराच्या घरात गेले आहे. एवढा परतावा कोणत्याही गुंतवणुकीत मिळत नाही. सामान्य नागरिकांचा आजही सोन्यावर विश्वास आहे. मुहूर्त देते समृद्धीची चाहूल असेच म्हणावे लागेल, असे अमोल ढोमणे म्हणाले.
 
 
ढोमणे ज्वेलर्सने आता हिंगणघाट येथे नव्याने शोरूम सुरू केले. वर्धेत आरती चौकात लोटस तर सराफा बाजारात जुने आणि मुख्य इमारत असे दोन शोरूम आहेत. ग्राहकांच्या विश्वासाने तीन पिढ्यांच्या पसंतीला एमटीडी वाट चाल करते आहे. गुढीपाडव्याला जिल्ह्यात करोडो रुपयांची उलाढाल होईल, असा विश्वास धनंजय ढोमणे यांनी व्यक्त केला.