पहा Viral Video विराटचा मैदानात क्रोध...

29 Mar 2025 15:25:15
Virat Kohli Khaleel Ahmed Viral Video आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाने शानदार सुरुवात केली आहे. आपल्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवत त्यांनी गुणतालिकेत पहिले स्थान कायम राखले आहे. याच विजयी घोडदौडीत आरसीबीने चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघावर ५० धावांनी दणदणीत विजय मिळवत ऐतिहासिक नोंद केली. मात्र, या सामन्यात विराट कोहलीची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. काही उत्तम फटके मारूनही तो मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. विशेष म्हणजे, सामन्यादरम्यान आणि सामन्यानंतरही विराट आणि सीएसकेचा गोलंदाज खलील अहमद यांच्यात वाद झाला. विराटच्या संतप्त प्रतिक्रियेमुळे हा सामना चर्चेचा विषय ठरला आहे.
 
 

Virat Kohli Khaleel Ahmed Viral Video 
 
 
 
मैदानावर विराटचा संताप
 
सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक गमावल्यानंतर आरसीबी संघ फलंदाजीसाठी उतरला. चेन्नईकडून खलील अहमदने उत्कृष्ट गोलंदाजी केली. Virat Kohli Khaleel Ahmed Viral Video  सलामीवीर विराट कोहलीला त्याने पहिल्याच चेंडूवर अडचणीत आणले. हा चेंडू पॅडवर जाऊन लागल्याने खलीलने अपील करत विकेट मिळाल्याचा आनंद साजरा केला. मात्र, बॉल ट्रॅकिंगमध्ये चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पिच झाल्याचे स्पष्ट झाल्याने विराट नाबाद राहिला. याच षटकात खलीलने एक बाउन्सर टाकला, ज्यावर विराटने पूल शॉट मारण्याचा प्रयत्न केला पण यशस्वी झाला नाही. यानंतर खलील विराटच्या अगदी जवळ येऊन त्याच्याकडे रोखून पाहत राहिला. यावर विराटनेही संतप्त प्रतिक्रिया दिली. तो खलीलकडे रागाने पाहत काहीतरी बोलताना दिसला.
 
सामन्यानंतरही वाद सुरूच, विराटचा खलीलला खुले आव्हान!
 
सामन्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहली आधी रवींद्र जडेजासोबत संवाद साधताना दिसतो. मात्र, त्याचे लक्ष खलील अहमदकडे जाताच तो संतप्त होत त्याच्यावर ओरडताना दिसतो. चाहत्यांच्या मते, विराटने खलीलला त्याच्या वर्तणुकीची आठवण करून दिली आणि पुढच्या वेळी त्याला योग्य उत्तर देईल, असे सूचित केले. त्याने खलीलला खुले आव्हान दिले की, "पुढच्या वेळी तू फक्त ये, मग बघ कसे फटके बसतात!" विराटच्या या संतप्त प्रतिक्रियेमुळे दोघांमधील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.आरसीबी आणि सीएसके या मोसमात पुन्हा एकदा भिडणार आहेत. हा महत्त्वपूर्ण सामना ३ मे रोजी आरसीबीच्या होम ग्राऊंड, चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात विराट कोहली आणि खलील अहमद यांच्यातील वाद आणखी चिघळतो का  हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
 
 
पहा व्हायरल व्हिडिओ  CSK vs RCB
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0