Natin Marli Mithi Song सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली ‘शिवा’ ही मालिका प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. या मालिकेतील शिवा, आशू, सिताई, रामभाऊ, दिव्या, चंदन, किर्ती, पाना गँग, बाई आजी आणि वंदना ही पात्रे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहेत. काही सकारात्मक, तर काही नकारात्मक असलेल्या या व्यक्तिरेखांनी चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. विशेषतः शिवा ही धाडसी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी असल्यामुळे प्रेक्षकांची लाडकी ठरली आहे. तर, थोडा लाजरा आणि गोंडस आशूही चाहत्यांचे मन जिंकताना दिसत आहे.
मालिकेत अलीकडेच मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. ज्या शिवाचा तिरस्कार सिताई करत होती, तिनेच आता शिवाला तिच्या वेगळेपणासह स्वीकारले आहे. मात्र, सिताईची मुलगी आणि आशूची बहीण किर्ती अजूनही शिवाविरुद्ध कारस्थान करताना दिसत आहे. या सर्व नाट्यमय घडामोडींच्या दरम्यान मालिकेतील कलाकार आता त्यांच्या एका खास व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत.
शिवा मालिकेत दिव्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री सृष्टी बहेकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत शिवा, दिव्या, बाई आजी, चंदन आणि पाना गँग ‘त्या नटीनं मारली मिठी’ या लोकप्रिय गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पारंपरिक वेशभूषेत असून, काहींनी फेटाही परिधान केला आहे. विशेष म्हणजे, हा व्हिडीओ अभिनेत्रीने ‘गुढीपाडवा स्पेशल’ म्हणून शेअर केला आहे. या व्हिडीओला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली असून, कमेंट्समध्ये कलाकारांच्या उत्साही वावराचे कौतुक केले जात आहे.‘शिवा’ मालिकेत अभिनेत्री पूर्वा कौशिक मुख्य भूमिकेत असून, ती शिवाची व्यक्तिरेखा साकारत आहे. तिच्या अभिनयशैलीला आणि हटके अंदाजाला प्रेक्षकांकडून मोठे प्रेम मिळत आहे. तसेच, आशूची भूमिका shiva fame actors dance on natin marli mithi song अभिनेता शाल्व किंजवडेकर याने साकारली असून, त्याचीही भूमिका रसिकांना भावली आहे. मालिकेतील कलाकारांची ऑनस्क्रीन जशी केमिस्ट्री जमली आहे, तशीच ऑफस्क्रीनसुद्धा त्यांची मैत्री चाहत्यांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे या मालिकेतील कलाकारांचे व्हिडीओ आणि फोटो प्रेक्षक मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.
व्हिडीओ व्हायरल