मुंबई,
Indias Got Latent Case इंडियाज गॉट लेटेंट केसच्या संदर्भात अभिनेत्री पूनम पांडे आणि विनोदी कलाकार कौस्तुभ अग्रवाल महाराष्ट्र सायबर सेलमध्ये पोहोचले. महाराष्ट्र सायबर सेल अभिनेत्री पूनम पांडे आणि कौस्तुभ अग्रवाल यांचे जबाब नोंदवत आहे. पूनम पांडे इंडियाज गॉट लेटेंट केसच्या संदर्भात अभिनेत्री पूनम पांडे आणि विनोदी कलाकार कौस्तुभ अग्रवाल आज महाराष्ट्र सायबर सेलमध्ये पोहोचले. महाराष्ट्र सायबर सेल अभिनेत्री पूनम पांडे आणि कौस्तुभ अग्रवाल यांचे जबाब नोंदवत आहे. पूनम पांडे इंडियाज गॉट टॅलेंटच्या सातव्या भागात जज म्हणून दिसली.
काय प्रकरण होते?
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि युट्यूबर YouTuber Ranveer Allahabadia रणवीर इलाहाबादिया यांनी अलीकडेच समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये पालकांशी संबंधित एक अश्लील प्रश्न विचारला होता ज्यासाठी त्यांच्यावर जोरदार टीका झाली. यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने या शोच्या व्हिडिओबद्दल रणवीर इलाहाबादिया आणि समय रैना यांना फटकारले होते आणि त्यांच्या शोवर बंदी घालण्यासोबतच चॅनेलवरील संपूर्ण कंटेंट डिलीट केला होता. रणवीर इलाहाबादिया आणि समय रैनाच्या या शोबद्दल संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती आणि सोशल मीडियावर लोकांनी त्यांच्याविरुद्ध मोर्चा उघडला होता. पालकांवरील अश्लील टिप्पण्यांचे प्रकरण इतके गंभीर झाले होते की सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला.याशिवाय, सायबर सेल पुन्हा रणवीर इलाहबाडिया, अपूर्व माखीजा, आशिष चंचलानी, रघु राम यांची चौकशी करेल आणि त्यांना पुरवणी जबाब नोंदवण्यासाठी बोलावेल होते. इंडियाज गॉट टॅलेंटच्या सातव्या भागात अभिनेत्री पूनम पांडे हि जज होती. तिच्या शैलीनुसार,कृतीनुसार ती नेहमीच प्रसिद्ध असते. सातव्या भागात पूनम पांडेने युट्यूबर रणवीर इलाहाबादिया याची स्तुती केली आहे असे दिसते.
पूणांची पोस्ट
पूनमने रणवीरच्या समर्थनार्थ समोर येऊन लोकांना त्याच्या अश्लील टिप्पणीबद्दल माफ करण्याचे आवाहन केले होते. पूनमने लोकांना जास्त ट्रोलिंग थांबवण्याची विनंती केली. "@BeerBicepsGuy बद्दल बरंच काही वाचत आहे... बस करो यार, गल्ती हो गई उसे... बच्चे की जान लोगे क्या ? माफ करदो यार." असे पोस्ट तिने केले होते. तिच्या पोस्टवर ऑनलाइन संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या, "बघा कोण त्याला पाठिंबा देत आहे... ज्यांची मानसिकता समान आहे ते बहुतेकदा त्यांच्या तथाकथित मित्रांना पाठिंबा देतात, असे नेटकऱ्यानी म्हंटले.