पंचकुला येथे हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले

सराव उड्डाणादरम्यान अपघात

    दिनांक :07-Mar-2025
Total Views |
हरियाणा,
IAFJaguar Fighter Jet भारतीय हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान आज हरियाणातील पंचकुला येथे कोसळले. हे विमान अंबाला एअरबेसवरून प्रशिक्षण उड्डाणासाठी निघाले होते. वैमानिक विमानातून सुरक्षित बाहेर पडण्यात यशस्वी झाला. भारतीय हवाई दलाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, पंचकुलाच्या डोंगराळ भागात असलेल्या मोरनी येथील बलदवाला गावाजवळ हे लढाऊ विमान कोसळले. अपघाताच्या वेळी, लढाऊ विमानाचा पायलट पॅराशूटच्या माध्यमातून सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहोचले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.