बारदाना गोदामाला आग, मोठा अनर्थ टळला

मोठ्ये नुकसान

    दिनांक :08-Mar-2025
Total Views |
वाशीम,
Washim रिसोड्र शहरातील मालेगाव नाका येथील भुसार व्यापार्‍याच्या बारदाना गोदामला आग लागू यामध्ये बारदानाचे नुकसान झाले. मात्र वेळीच सदर आग आटोयात आणल्याने एक मोठा अनर्थ टळला असल्याचे बोलले जात आहे.
 

Malegaon 
याबाबत माहिती अशी की रिसोड शहरातील मालेगाव नाका परिसरात जीवन कोठुळे यांची ट्रेडिंग कंपनी असून, यामध्ये ते सोयाबीन, तूर, चना, हळद इत्यादी शेतमाल शेतकर्‍यांकडून विक्री घेत असतात. यामध्ये त्यांचा एक मोठा बारदानाचा गोदाम आहे. ८ मार्च रोजी सकाळी ११. ३० वाजताचे दरम्यान बारदाना गोदामातून धूर निघत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनात आले. याबाबत तातडीने नगरपरिषद अग्निशमन दल विभागाला सदर घटनेची माहिती देण्यात आली. नगरपरिषद अग्निशमन दल कर्मचारी चालक अझरुद्दीन, संजू पवार व सागर जाधव हे घटनास्थळी तातडीने पोहोचले व त्यांनी स्थानिक कामगाराच्या मदतीने वेळीच सदर आग आटोयात आणली, यामुळे या ठिकाणी एक मोठा अनर्थ टळला असल्याचे बोलले जात आहे.