पालकमंत्र्यांना घालणार घेराव
अमरावती,
Congress stormed the MP office शहरातील अनिमित पाणी पुरवठ्याबाबत शहर काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवार, १ एप्रिल रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात धडक देऊन अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे. शहरातील संपूर्ण नागरिक उन्हाने त्रस्त आहेत. मागील गेल्या एक ते दीड महिन्यापासून अमरावती शहरातील बहुतांश भागामध्ये पिण्याच्या पाण्याचे अतोनात हाल सुरू आहेत व यामुळे शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर त्रस्त झालेले आहे. शहरातील काही भागातील परिसरामध्ये रात्रीचे ११, १२ वाजता पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे सुरू आहे.

रात्रीच्या वेळी पाणी सोडण्याचे कार्य हे एकदम अयोग्य आहे. या सर्व बाबींवर मजिप्रा कार्यालयात विचारणा केल्यावर प्रत्येक वेळेस वेगळीवेगळी कारणे देण्यात येतात. तसेच शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. वारंवार तक्रार करून सुद्धा यावर कुठलाही तोडगा काढण्यात येत नाही. Congress stormed the MP office त्यामुळे मंगळवार १ एप्रिल रोजी काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ कार्यकारी अभियंता यांना भेटले. शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत यांच्या अध्यक्षतेमध्ये व माजी महापौर विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद चिमोटे, प्रदेश उपाध्यक्ष भैय्याजी पवार, महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत मजीप्रा अधिकार्यांना धारेवर धरले.
मजिप्रा अधिकार्यांशी चर्चा करीत असताना अधिकार्यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला सांगितले की,अ मरावती शहराला जेवढ्या पाणीपुरवठ्याची गरज आहे तेवढे पाणी अमरावती मजीप्राला आणणे शक्य होत नाही, कारण ज्या मोठ्या पाईपलाईन्स आहेत त्या कमकुवत झालेल्या आहेत. Congress stormed the MP office नवीन पाईपलाईनच्या कामासाठी ऑक्टोबर २०२४ ला वर्कऑर्डर दिल्यानंतर सुद्धा ठेकेदार काम करीत नाही. तसेच वारंवार खंडित होणार्या वीज पुरवठ्याचीही समस्या मजीप्रा अधिकार्यांनी सांगितली. येणार्या काळात जीवन प्राधिकरणासह या सर्व यंत्रणांनी शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा केला नाही तर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने घेराव करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी प्रामुख्याने संजय वाघ, अशोक डोंगरे, मुन्ना राठोड, प्रदीप हिवसे, शोभा शिंदे, वंदना कंगाले, ज्योत्स्ना गुल्हाने, सलीम मीरावाले, रमेश राजोटे, गुड्डू हमीद, संजय बोबडे, गजानन जाधव, राजाभाऊ देशमुख, अतुल काळबेंडे, अभिजित गुल्हाने, अफझल पठाण, पंकज मेश्राम, अभिनंदन पेंढारी, अशोक डोंगरे यांच्यासह शेकडो मान्यवर उपस्थित होते.