महामेट्रो व मनपाच्या वतीने फिडर सर्व्हिस सुरू

    दिनांक :01-Apr-2025
Total Views |
नागपूर,
Feeder Service : महामेट्रो व मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने सेंट व्हिन्सेंट पलोटी अभियांत्रिकी विद्यार्थी व शिक्षकांसाठी १ एप्रिलपासून साउथ एअरपोर्ट स्टेशन ते महाविद्यालयापर्यंत फिडर बससेवा सुरू करण्यात आली आहे.
 
 
nagpur-metro
 
शहरातील अधिक नागरिकनांनी मेट्रो व आपली बस या सार्वजनिक वाहतूक सेवेचा उपयोग करीत प्रदूषण कमी करण्यात मोलाची भूमिका बजाविणार असल्याचा विश्वास महा मेट्रोतर्फे करण्यात आल आहे.
 
 
शहरातील विविध शैक्षणिक, औद्योगिक, - शासकीय, निमशासकीय, निवासी संकुले इ संस्थांमध्ये ’मेट्रो संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या वापराचे फायदे व सवलतीबद्दल माहिती दिल्या जाते. याच श्रृंखलेत सेंट व्हिन्सेंट पलोटी अभियांत्रिकी महाविद्यालयात मेट्रो संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिक्षक व विद्यार्थ्यांचे महाकार्ड व बसपास तयार करण्यासाठी विशेष शिबीर घेण्यात आला. शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी तयार झाल्यामुळे फिडर सेवेला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. शिक्षक व विद्यार्थी मेट्रोने साउथ एअरपोर्ट स्टेशनपर्यंत पोहोचतील व महाविद्यालयापर्यंत मनपाच्या ई-फि डरबससेवेचा वापर करतील.
 
 
मेट्रोने मनपाच्या सहकार्याने यापूर्वी मिहानमधील कंपन्यांचे अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी खापरी मेट्रो स्टेशनपासून १० विशेष फिडर बसेसची सोय केली आहे तसेच प्रजापतीनगर मेट्रो स्टेशनपासून वाठोडा येथील इंटरनॅशनल पर्यंत फिडर बसेसची सोय करण्यात आली आहे. महा मेट्रोच्या विनंतीनुसार मनपाच्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटतर्फे १० मार्गांचे रॅशनालायझेशन करण्यात आले असून ४ नवीन फिडर मार्ग सुरू करण्यात आले आहे. याशिवाय नागपूर विमानतळापासून एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंत फिडर सर्व्हिस यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे.