रामनवमी उत्सव समितीतर्फे भव्य शोभायात्रेचे आयोजन

01 Apr 2025 21:40:07
वणी,
Ram Navami Festival Committee :  श्रीराम नवमी उत्सव शोभायात्रा समितीतर्फे रविवार, 6 एप्रिल रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभायात्रेत विविध देखावे, अयोध्येतील रामललांची देखणी मूर्ती, शीकृष्ण, भगवान शंकर आणि हनुमान यांच्या मूर्ती विशेष आकर्षण ठरणार आहेत.
 
 
SHRI RAAM
 
शेगावच्या श्रीगजानन महाराज देवस्थानच्या भजन मंडळीसह विविध ठिकाणांहून आलेली भजन मंडळी कला सादर करणार आहे. याशिवाय, रामरथ, रामपालखी, घोडे, विविध बँड पथके अशा विविध पालख्यांसह ही शोभायात्रा निघणार आहे. विशेष आकर्षण म्हणून हरियाणातील ‘लाईव्ह हनुमान’ या शोभायात्रेत सहभागी होणार आहे. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने रामभक्तांनी सहभाग व्हावे, असे आवाहन प्रभू श्रीराम नवमी उत्सव समितीचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांनी केले आहे.
 
Powered By Sangraha 9.0