नागपूर,
Vijay Trivedi : सामाजिक समरसतेच्या क्षेत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वात मोठे होत आहे. संघ शिक्षा वर्गात जात-पात, शिक्षण, संपत्ती, वय या सर्वांना बाजूला ठेवून स्वयंसेवक एकत्रित धडे घेत आहेत. बदलत्या काळाप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात देखील बदल दिसून येत आहे. गेल्या दहा दशकांत संघ जगभर पोहोचविण्यात स्वयंसेवकांचे अविरत परिश्रम मोलाचे ठरले आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक विजय त्रिवेदी यांनी केले.
डॉ. हेडगेवार जयंती निमित्त धरमपेठ येथील धरमपेठ कन्या शाळेतील शहापूरकर सभागृहात आयोजित ज्ञानयोद्धा व्याख्यमालेत ते बोलत होते. यावेळी मंचावर ज्ञानयोद्धा व्याख्यमालेचे आयोजक दिलीप देवधर, निवासी संपादक देवेंद्र गावंडे, ज्येष्ठ पत्रकार सुनील कुहीकर उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष हा व्याख्यानाचा विषय होता.
संघाची ताकत शंभर वर्षांची
विजय त्रिवेदी म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. ८० हजार शाखा असलेल्या संघटनेला हे यश मिळविण्यासाठी खुप कष्ट सहण करावे लागले आहे. स्वयंसेवकांच्या परिश्रमामुळेच संघ आज सातासमुद्रापलीकडे विस्तारला आहे.
संघ एक वटवृक्षाप्रमाणे बहरला
त्याग, तपस्यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक स्वयंसेवक तयार झाले आहे. हीच संघाची ताकत शंभर वर्षांची झाली आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाला यश मिळवून देण्यात याच संघटनेची मदत झाली आहे. काळानुसार काही बदल स्विकारल्यामुळेच संघ एक वटवृक्षाप्रमाणे बहरला असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सुनील कुहीकर यांनी केले.
सामाजिक समरसतेलाप्राधान्य
देवेंद्र गावंडे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, संघाला समजून घेणे सोपे नाही, संघात राष्ट्रीय सेवा आणि परंपरा व वारसा जपण्यावर भर दिल्या जातो. हिंदुंना संघटित करण्यासाठी डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती. राष्ट्रीय सेवा आणि भारतीय परंपरा व वारसा जपण्यावर भर देत असलेल्या संघाची आज दमदार वाटचाल सुरू आहे. केंद्रात सरकार आल्यानंतर संघाचा राजकीय प्रभाव वाढला आहे. गत लोकसभा विधानसभा भाजपच्या यशामागे संघाचे एकत्रित कार्य मोलाचे ठरले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सामाजिक समरसतेला प्राधान्य दिले आहे. दिलीप देवधर म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गत शंभर वर्षात आत्मनिर्भर भारत करण्याची शक्ती निर्माण केली आहे. तसेच दरम्यानच्या काळात गर्व से कहो हम हिंदू है ... हा नारा बुलंद केला आहे.