निळ्या बटाट्याच्या शेतीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

12 Apr 2025 14:47:27
मुंबई,
Blue potatoes पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन अधिक नफा देणाऱ्या पिकांकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी निळा बटाटा हा एक नविन आणि फायदेशीर पर्याय ठरत आहे. उत्पादन खर्च तुलनात्मकदृष्ट्या कमी आणि बाजारभाव चांगला मिळत असल्याने निळ्या बटाट्याची शेती आता शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या उपयुक्त ठरू लागली आहे. यासोबतच आरोग्यदृष्ट्या मिळणारे फायदेही या पिकाचे महत्त्व वाढवत आहेत.
 
 
Blue potatoes

निळा बटाटा म्हणजे काय?
निळ्या बटाट्याचा रंग नैसर्गिकरित्या गडद निळसर जांभळा असतो. त्यामध्ये अँथोसायनिन्स नावाचे अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते, जे शरीरातील सूज, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि कर्करोगापासून संरक्षण करण्यास मदत करते. ही बटाट्याची जात मुख्यतः South America दक्षिण अमेरिका आणि युरोपमध्ये प्रसिद्ध असली, तरी आता भारतातही त्याचे उत्पादन वाढू लागले आहे.
शेतीसाठी पोषक घटक व उत्पादन क्षमता
पिकाचा कालावधी: 90 ते 110 दिवस
हवामान: समशीतोष्ण हवामानात उत्तम उत्पादन
उत्पादन खर्च: तुलनेने कमी, कीटकनाशकांची गरज कमी
उत्पन्न: एका एकरातून सरासरी 8 ते 10 टन उत्पादन
बाजारभाव: 50 ते 80 रुपये प्रति किलो; ऑर्गेनिक मार्केटमध्ये अधिक दर
 
शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या कसा लाभ?
 
निळ्या बटाट्याला खासकरून होटेल इंडस्ट्री, हेल्थ फूड ब्रँड्स आणि ऑर्गेनिक स्टोअर्समध्ये मोठी मागणी आहे. त्यामुळे सामान्य बटाट्याच्या तुलनेत याला 3 ते 4 पट अधिक दर मिळतो. शेतकरी सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा थेट विक्रीद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचून अधिक नफा मिळवू शकतात.
उदाहरण: एका एकरातून 10 टन उत्पादन आणि दर प्रतिकिलो 60 रुपये गृहित धरल्यास एकूण उत्पन्न 6 लाख रुपये होऊ शकते. त्यातून उत्पादन खर्च वजा केल्यास सरासरी 3.5 ते 4 लाख रुपयांचा नफा मिळू शकतो.
 
 
निळ्या बटाट्याचे आरोग्यदायी फायदे
 
 
अँटीऑक्सिडंट्सचा समृद्ध स्रोत
रक्तदाब नियंत्रणात ठेवतो
हृदयासाठी लाभदायक – कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत
डायबेटिक रुग्णांसाठी उपयुक्त – कमी ग्लायसेमिक इंडेक्स
अँटी-कॅन्सर गुणधर्म
नवीन पर्यायांचा शोध घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी निळा बटाटा हे एक संभाव्य यशाचे आणि आरोग्यदायी भविष्य असू शकते. सरकार आणि कृषी विभाग यांचा सक्रिय पाठिंबा मिळाल्यास ही शेती आणखी व्यापक प्रमाणावर विस्तारू शकते.
Powered By Sangraha 9.0