jatt movie बॉलीवूडचा दमदार अॅक्शन हिरो सनी देओल सध्या त्याच्या नवीन चित्रपट 'जात'मुळे चर्चेत आहे. १० एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळवत आहे. 'जात'ने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ९.५ कोटी रुपये कमावले, तर दुसऱ्या दिवशी ७ कोटींचा गल्ला जमवला. या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता, येत्या दिवसांत त्याच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सनी देओलच्या Sunny Deol या यशामुळे त्याची सावत्र आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी अभिमान व्यक्त केला आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात 'इन्स्टंट बॉलिवूड'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी सांगितले, “चित्रपट खूप मोठ्या बंपरसह उघडला आहे. खूप छान वाटतंय. लोकांना हा चित्रपट आवडतोय आणि सनीचं कामही दमदार आहे.”हेमासोबत उपस्थित असलेली तिची मुलगी ईशा देओल हिनेही तिच्या भावाचे कौतुक केले. 'जात'ला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे ती अत्यंत आनंदी असल्याचे तिने सांगितले. ईशा म्हणाली, “हे सर्व त्याच्या मेहनतीचं फळ आहे. लोक त्याच्यावर खूप प्रेम करतात आणि त्यामुळेच चित्रपटाला चांगली सुरुवात मिळाली. यापुढेही असंच यश त्याच्या वाट्याला यावं, हीच इच्छा.”
सनी देओलचा 'जात' हा एक अॅक्शन ड्रामा चित्रपट असून तो त्याच्या उच्च दर्जाच्या नाट्यमय दृश्यांसाठी, दमदार पात्रांसाठी आणि प्रभावी संवादांसाठी ओळखला जात आहे. Sacnilk.com च्या अहवालानुसार, चित्रपटाची १० एप्रिलपर्यंतची एकूण हिंदी ऑक्युपन्सी १२.८९% इतकी आहे, जी एका सोलो अॅक्शन रिलीजसाठी समाधानकारक मानली जाते.
'जात' चित्रपटातून सनी देओलने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की त्याचा अॅक्शन स्टार म्हणून अजूनही तगडा प्रभाव आहे. हेमा मालिनी आणि ईशा देओल यांचा अभिमान व्यक्त करणारा प्रतिसादही या यशात अधिक भर घालतो.