विदर्भाच्या माथ्यावरील दुष्काळाचा कलंक पुसणार : मुख्यमंत्री फडणवीस

13 Apr 2025 19:32:09
आर्वी,
Devendra Fadnavis आर्वीत सिंचन योजनेचे यापुर्वीच लोकार्पण करायचे होते. ते होऊ शकले नाही. परंतु, आज त्या प्रकल्पाच्या लोकार्पणसह अनेक विकास कामांचे भुमिपूजन आणि लोकार्पण झाले. यातून आ. सुमित वानखेडे सातत्याने विकासाच्या कामांची तळमळ दिसुन आली. आपण उपसा सिंचन योजनेच्या फाईलवर स्वाक्षरी करून आलो तर वाढोणा पिंपळखुटा उपसा सिंचन योजनेला मान्यता देऊ. नळगंगा वैनगंगा प्रकल्पाच्या माध्यमातून ५५० किमीची एक नदीच आपण तयार करतो आहोत. या माध्यमातून विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडार्‍यासह वाशिमपर्यंत १० जिल्ह्यांना लाभ मिळणार आहे. विहीर पुनर्भरण सारखे प्रकल्प राबवत आपल्याला विदर्भाच्या माथ्यावरील दुष्काळाचा कलंक पुसायचा असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
 
Devendra Fadnavis
 
 
 
येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणासह ७२० कोटींच्या विकास कामांचे ई-लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमात ते आज रविवार १३ रोजी बोलत होते. Devendra Fadnavis यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, खा. अमर काळे, आ. दादाराव केचे, आ. सुमित वानखेडे, आ. समीर कुणावार, आ. राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, ज्येष्ठ नेते सुधीर दिवे, सरिता गाखरे, प्रशांत सव्वालाखे, नंदू थोरात, जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
 
 
 
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, वर्धा जिल्ह्यात अप्पर वर्धा प्रकल्प, वाढोणा-पिंपळखुटा आदी सिंचन प्रकल्पांद्वारे शेतीसाठी पाणी व वीज उपलब्ध करून देऊ आणि जिल्ह्यातून जाणार्‍या समृद्धी महामार्गावरील नोडवर एमआयडीसी उभारुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येईल. Devendra Fadnavis शेतीसाठी १२ तास विजेची शेतकर्‍यांची मागणी होती. यादृष्टीने राज्य शासनाने प्रभावी अंमलबजावणी सुरू केली असून डिसेंबर २०२६ पर्यंत ८० टके शेतकर्‍यांना ३६५ दिवस दिवसाला १२ तास मोफत वीज उपलब्ध करुन दिली जाणार आहे. राज्य शासनाने २०२५ ते २०३० पर्यंत राज्यातील वीज वापरकर्त्यांचे वीज बील दरवर्षी कमी करण्याचे नियोजन व तशी कार्यवाही सुरू केली आहे. ३०० युनिटपर्यंत वीज वापरणार्‍या मध्यम वर्गीय व गरीब कुटुंबांना सौर ऊर्जेअंतर्गत आणून मोफत वीज देण्यात येईल असे ते म्हणाले.
 
आर्वीत विविध महत्वाच्या विकास कामांचे लोकार्पण झाले आहे. याद्वारे या भागातील विकासाला चालना मिळेल. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गामुळे विकासाला गती आली. वर्धेतून सुरू होणार्‍या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग आणि ना. गडकरी यांनी तयार केलेल्या सिंदी रेल्वे येथील ड्रायपोर्टमुळे जिल्हा मध्यभारताचे लॉजिस्टीक केंद्र म्हणून उदयाला येत आहे. या जिल्ह्यातून जाणार्‍या समृद्धी महामार्गावरील विरुळ नोडला राज्य शासनाकडून लवकरच मान्यता देऊन येथे एमआयडीसी उभारली जाणार आहे. Devendra Fadnavis या माध्यमातून उद्योगासाठी इको सिस्टीम तयार होऊन स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रासाठी १६.५ लाख कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले असून यातील ७ लाख कोटींचे करार विदर्भासाठी करण्यात आले आहे. वर्ध्यासह विदर्भातील अन्य जिल्ह्यांमध्येही या माध्यमातून मोठी गुंतवणूक येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. संचालन ज्योती भगत यांनी केले. प्रास्ताविक जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी तर आभार उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट यांनी मानले.
Powered By Sangraha 9.0