तभा वृत्तसेवा
ब्रम्हपुरी,
Farmer killed in tiger attack सरपणासाठी गावालगतच्या जंगलात गेलेल्या शेतकर्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना रविवार, 13 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास तालुक्यातील चिचखेडा परिसरातील जंगलात घडली. विनायक विठोबा जांभुळे ( 58, रा. चिचखेडा) असे मृत शेतकर्याचे नाव आहे. विनायक जांभुळे हे रविवारी सकाळच्या सुमारास मोह वेचून घरी आले. त्यानंतर मोहाची टोपली घरी ठेवून ते सायकलने सरपणासाठी गावालगतच्या जंगलात गेले होते.
दरम्यान चिचखेडा-पातळी रस्त्यापासून सुमारे 100 ते 150 फूट अंतरावर वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ते जागीच ठार झाले. Farmer killed in tiger attack घटनेची माहिती कळताच वनविभाग व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतेह विच्छेदनासाठी ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने या भागात गस्त वाढवावी व तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.