सांस्कृतिक केंद्रात विशेष प्रदर्शनाचे आयोजन

13 Apr 2025 19:59:23
नागपूर,
NAGPUR दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने सिव्हील लाइन्स येथील सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात १४ व १५ एप्रिल असे दोन दिवसीय विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात १४ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता विशेष प्रदर्शनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि वारसा, संविधान तयार करण्यात महिला सदस्यांचे योगदान आणि संविधान तयार करताना समित्या आणि अध्यक्ष तसेच भारतीय संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अद्वितीय योगदानावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
 
 

NAGPUR
सांस्कृतिक मंत्रालयाचे संयुक्त सहसचिव समर नंदा यांच्या हस्ते उद्घाटन होईल. यानंतर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान या विषयावर प्रदीप आगलावे हे व्याख्यान देतील. या कार्यक्रमाची सांगता शाहीर ईश्वर पाटील आणि त्यांच्या पथकाच्या पोवाडा गायन या सादरीकरणाने होईल. तर १५ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता क्रांती विचार हे वैचारिक महानाट्य आयोजित करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0