प्रफुल्ल व्यास
वर्धा,
Sumit Wankhede मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार होण्यापूर्वीपासुन सुमित वानखेडे यांचे नाते सार्या महाराष्ट्राला ठाऊक आहेत. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपले सहकारी समित वानखेडे यांना तिकीट देत निवडून आणले. वानखेडे यांनी निवडणुकीपूर्वीच आपल्या मतदार संघाला विकासाची चाहुल लावून दिली होती. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी निवडणुकीत मतदारांना दिलेला शब्द पुर्ण करण्यासाठी धडपड सुरू केले. अभ्यास असल्याने अनेक प्रकल्पाच्या फायलीच त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या टेबलावर स्वाक्षरीसाठी ठेवल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आर्वीत विकास कामांचे लोकार्पण होत असताना शिष्य सुमित यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठी दोन शेर मांडले आणि गुरू मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिष्याच्या शेरला एक शेरने उत्तर देत अख्खे सभागृह हास्यात बुडाले.

आर्वी येथे विविध कामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी भाषण करताना आ. सुमित वानखेडे यांनी विविध मागण्या केल्या. Sumit Wankhede मुख्यमंत्री फडणवीस यांना ‘भाऊ ते साहेब’ असे संबोधन शायरीतून स्तुतीसुमने उधळली तर देवेंद्र फडणवीसांनीही आपल्यावरील कौतुकाची फेड त्याच पद्धतीने शायरीतून केली. दोन्ही नेत्यांमधील हा शायरी का अंदाज जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. आ. सुमित वानखेडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी होते.
तुम आ गये हो तो चांदणीशी बात है...
जमीन पर चांद कब रोज रोज उतरता है!!
असा शेर म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या रुपात आर्वीत चंद्र उतरल्याचे म्हटले... पण, जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण कराला उठले तेव्हा आ. सुमित वानखेडे यांच्या शायरीची आठवण करत त्यांनीही शायरीतूनच प्रतिउत्तर दिले.
ना. फडणवीस म्हणाले, आमदार, खासदार आणि मंत्री महोदयांनी इतया मागण्या केलेल्या आहेत, त्या सगळ्या मागण्या मान्य केल्या तर बाकी आमदार म्हणतील तुम्ही सगळं इथेच देता का, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शायरीतून आपली भूमिका मांडली. सुमित वानखेडेंनी माझ्यासाठी इतया शायरी केल्या, पण त्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर माझ्या भाषणानंतर ते म्हणतील...
वो आये मेरी मजार पर, मिट्टी झाड कर बैठ गये ! ,और दीए मे जो तेल था वह सर पर लगाकर चले गये ! असे ना. फडणवीस म्हणताच उपस्थितांनी हसून आणि टाळ्या वाजवून दाद दिली. यावेळी आ. वानखेडे यांनी तळेगाव येथे ३०० खाटांच्या रुग्णालयाला मान्यता देण्यात यावी, अशी मागणी केली.