तळेगावातील जागतिक दर्जाच्या हॉटेलला आग, लाखोंचे नुकसान

*सुदैवाने जीवितहानी टळली

    दिनांक :13-Apr-2025
Total Views |
तळेगाव (श्या.पं.), 
Talegaon-hotel fire : येथील प्रसिद्ध असलेल्या बॅट अ‍ॅण्ड बॉल हॉटेलमध्ये आज रविवार १३ रोजी शॉर्टसर्किट मुळे अचानक आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी टळल्याने अनेकांनी सुटकेचा नि:श्वास घेतला. रविवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास या हॉटेलला आग लागली. त्यावेळी तेथे जिल्ह्याचे पालकमंत्री व हिंगणघाटचे आमदार हॉटेलमध्येच उपस्थित होते.
 

wardha 
 
 
आग लागण्याच्या काही वेळेपूर्वीच त्यांनी हॉटेलमध्ये जेवण घेतले व बाजूला असलेल्या व्हीआयपी करिता असलेल्या खोलीमध्ये चर्चा करण्याकरिता गेले होते. तेथून ते बाहेर पडताच एका एकी आगीचा डोंब उठला.पाहता पाहता आगीने रूद्र रूप धारण केले.आगीच्या ज्वाळा दूर पर्यंत दिसत होत्या.पालक मंत्री तेथेच असल्यामुळे त्यांनी लागलीच प्रशासनास फोन करून माहिती दिली.लगेच काही वेळाने आर्वी,कारंजा,तिवसा सेलू येथील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले.
 
 
अग्नीशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यत यश आले अग्नी शमन दलाच्या गाड्या ये पर्यंत आगी मुळे खूप मोठ्या प्रमाणात इमारतीचे नुकसान झाले होते.घटना स्थळावर लागलीच आर्वी विधान सभेचे आमदार सुमित वानखेडे हजर झाले.त्यांनी कर्तव्यावर उपस्थित असलेल्या अग्नी शमन दलाच्या जवानांना सूचना केल्या.अग्नी शमन दलाच्या गाड्या येई पर्यंत गावातील तरुणांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला पण यात त्यांना यश आले नाही.कारणआगीने रूद्र रूप धारण केले होते.
 
 
मोठी हानी टळली
 
 
ज्या हॉटेल मध्ये आग लागली त्या इमारतीच्याच बाजूला अग्रवाल यांचा पेट्रोल पंप आहे.जर आग आणखी काही वेळा असती तर मात्र नक्कीच मोठी घटना घडली असती.त्या हॉटेल ला लागूनच पेट्रोल पंप आहे त्यामुळे नागरिकांन मध्ये घबराटीचे वातावरण होते.पेट्रोल पंप चे बाजूने सुध्दा अग्नी शमन ची गाडी आग विझवण्याकरिता आली होती.
 
 
नागरिकांची तोबा गर्दी
 
 
तळेगाव येथील प्रख्यात हॉटेल ला आग लागल्याचे वृत्त्त गावात समजताच नागरिकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती.यावेळी पोलिसांनी नागरीकांना बाहेर काढत योग्य भूमिका निभावली.