वर्धा,
Former MP Tadas News परिस्थितीचे गांभीर्य बघता रुग्णवाहिकेची वाट न पाहता माजी खासदार रामदास तडस यांनी स्वतःच्या गाडीने रुग्णांना रुग्णालयात दाखल केले. बुट्टीबोरी-तुळजापूर रस्त्यावरील हिंदी विश्व विद्यालय जवळील हा अपघात घडला. बुट्टीबोरी-तुळजापूर NH 361 रस्त्यावर वर एक मोटरसायकलचा अपघातात होवून २ महिला व १ पुरुष जखमी झाले. दरम्यान माजी खासदार रामदास तडस वर्धा येथे जात असताना त्यांना रस्त्यावर गर्दी दिसली. दरम्यान गाडी थांबवून त्यांनी पाहणी केली असता त्यांना ही घटना निदर्शनास आली. यावेळी त्यांनी प्रशासनाला घटनेची माहिती फोनद्वारे कळवून तातडीने व्यवस्था करण्यास सांगितले. मात्र अपघात स्थळावरील गांभीर्य बघता विलंब न करता त्यांनी स्वतःव सावंगी(मेघे))येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात रुग्णांना दाखल केले. व सर्वोतोपरी मदत करण्यास रुग्णालय प्रशासनाला निर्देश दिले.