सोन्याचे दर लाखाला दोन हजारच कमी

* वर्षभरात तोळ्यामागे २० हजारांनी वाढ

    दिनांक :17-Apr-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
वर्धा,
Gold Rates : ऐन लग्नसराईच्या हंगामात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आज गुरुवार १७ रोजी सराफा बाजारात सोने प्रतितोळा ९८ हजार (जीएसटीसह) होते. वर्षभरात सोन्यामागे प्रतितोळा २० हजार रुपयांनी वाढ झाली असून सोन्याने भाववाढीचा उच्चांक गाढला आहे. सोन्याच्या भावात अजून वाढ होण्याची शक्यता ढोमणे ज्वेलर्सचे संचालक सौरभ ढोमणे यांनी सांगितले.
 
 
WARDHA
 
भारताला पूर्वी सोन्याची खाण संबोधल्या जाते. जँहा..डाल... डाल...पर... सोने... की... चिडिया करती... है... बसेरा, असे एका गीतातूनही म्हटले आहे, ते उगीच नाही. आजही प्रत्येकाच्या घरी काहीना, काही सोने आहेच. पूर्वीचे लोक वस्तू खरेदीपेक्षा सोने खरेदीला प्राधान्य देत होते. बाजारात कापूस विक्री केल्यानंतर थेट सोनाराकडे जाऊन सोने खरेदी करायचे, पण आज ती परिस्थिती नाही. कारण शेतमालाच्या भावाच्या तुलनेत सोने खरेदी करणे शक्य नाही. तर सर्वसामान्य नागरिक विवाहातसुद्धा सोने खरेदी करू शकत नाही. साधारणतः वर्षभरापूर्वी सोन्याचे दर ७५ ते ८० हजार रुपये प्रतितोळा होते. वर्षभरात तब्बल सोन्याने भाववाढीचा उच्चांक गाठला आहे. गुरुवारी सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रतितोळा १ लाखाच्या जवळ होता. यामुळे आता सोने खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहे. तर चांदीही प्रतिकिलो ९९ हजारांवर गेली आहे.
 
 
 
बहुतांश धनदांडग्यांनी गुंतवणूक म्हणून सोने खरेदी केले आहे. ते मालामाल झाले आहे. कारण आठ ते दहा महिन्यात प्रतितोळा २० हजार रुपयांची वाढ झाली आहे. एवढा परतावा कोणत्याच व्यापार्‍यातून मिळणे शक्य नाही. यामुळे ज्यांच्याकडे पैसा आहेत. त्यांचा सोने खरेदीकडे कल वाढला आहे. तर अमेरिका आणि चीनच्या व्यापारी युद्धाचा परिणामसुद्धा सोन्याच्या भाववाढीवर झाल्याची बाजारात चर्चा आहे.
 
 
१७ दिवसात सपाट्याने वाढ : ढोमणे
 
 
अमेरिकेने सर्व देशावर कर लावले आहे. सर्व देशातील मार्केटपडेल अशी शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे व्यावसायिकांनी सोन्यात जास्तीत जास्त गुंतवणूक करून आपला पैसा सुरक्षित केला आहे. तर चीनने एलआयसीला सोने खरेदी करण्याचा अधिकार दिला आहे. एकंदरीतच सर्वच क्षेत्रातून सोन्याची मागणी वाढत असल्याने भाव वाढले आहे. इतिहासात मागील १७ दिवसांत सोन्याच्या भावात जेवढी तेजी आली तेवढी कधीच आली नाही. भविष्यात सोन्याचे भाव पुन्हा वाढतील, अशी माहिती ढोमणे ज्वेलर्सचे संचालक सौरभ ढोमणे यांनी दिली.