पुलगाव,
Criticism about Dr. Ambedkar शहरातील एका युवतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल टीका केल्यामुळे संतप्त झालेल्या डॉ. आंबेडकर अनुयायांनी पुलगाव पोलीस स्टेशन मध्ये मोठ्या संख्येने जमून कारवाईची मागणी केली. पुलगाव पोलिसांनी गुन्हा जरी दाखल केला असला तरी अद्याप आरोपी युवतीला अटक न केल्यामुळे नगरपरिषद समोर असलेल्या डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर हजारो आंबेडकर अन्यायी घोषणा देत उभे आहे.
शहरातील परिस्थिती चिघळू नये म्हणून आंबेडकर चळवळीतील अनेक नेते तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते तसेच पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहेत. Criticism about Dr. Ambedkar परंतु पोस्ट टाकणाऱ्या युवतीला अटक करून जोपर्यंत ती माफी मागत नाही तोपर्यंत जमा असलेला जमा जागा सोडलेला तयार नाही. जब जशी वेळ वाढत आहे तस तसा जमावाची संख्याही वाढत आहे. सदर युवतीने वर्धा येथे पोलीस स्टेशनला स्वतःहून अटक करून घेतल्याचे कळते. पुलगाव पोलिसांनी या युवतीवर गुन्हा दाखल केला आहे.