गावाच्या सलोख्यासाठी ५० फूट उंचावर लटकतात ते दोघे

18 Apr 2025 21:48:59
वर्धा, 
Gala Chariot Yatra स्वत:साठी, कुटुंबासाठी देवदेवतांना नवस केल्या जातात. वेळप्रसंगी धार्मिक विधीही केले जातात. परंतु, तालुयातील पवनूर येथे गावावर अरिष्ट येऊ नये तसेच गावातील सलोख्यासाठी दोन इसम गेल्या अनेक वर्षांपासुन लाकडी बैलगाडीपासुन ५० फूट उंचीवर लाकडी झुल्यावर लटकत गाव प्रदक्षिणा करतात. ही गळाची यात्रा जिल्ह्यात प्रसिद्ध असुन सासरी गेलेल्या लेकी माहेरी येतात. गावात दिवाळीसाखरा हा उत्सव साजरा करीत एकीचे दर्शन घडते.
 
 
४
 
तालुयातील धार्मिक दृष्टीने महत्त्वाची मानल्या जाणार्‍या पवनूर येथे गळाची रथयात्रा महोत्सवाचे आयोजन चैत्र कृष्ण पक्ष पंचमी १७ एप्रिल रोजी करण्यात करण्यात आले होतेे. या रथयात्रेला ३०६ वर्षांची परंपरा आहे. पवनूर येथे शेवटच्या टोकावर पातालमाता देवी गावचे ग्रामदेवता म्हणून ओळखले जाते. Gala Chariot Yatra चैत्र महिन्यात चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी गळाची रथयात्रा होते. गावातील आरिस्ट येऊ नये म्हणून तसेच गावातील सामाजिक सलोखा अबाधित टिकून राहावा यासाठी या यात्रेचे गावकर्‍यांच्या सहकायनि आयोजन केले जाते. लाकडी झुला लटकवून गावातील देवीभक्त अरुण लांडे आणि त्याचा सहकारी गावात परिक्रमा करतात.
 
लाकडी बैलबंडीपासून ५० फूट अंतरावर लाकडी झुल्यावर दोघेही सहकारी त्याला लटकतात. गळाचा रथ सजविण्यासाठी गावातील स्थानिक गळ समिती गळाची आकर्षक सजावट करतात. यात्रेच्या दिवशी घरोघरी पाणग्यांचा नैवेद्य दाखवला जातो. यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्यामुळे गावात नवचैतन्य पसरले होते. ही यात्रा महोत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांची उपस्थिती होती. Gala Chariot Yatra यशस्वीतेसाठी अरुण लांडे, सुरेंद्र कारणकर, सागर कोंडलकर, प्रवीण चौधरी, रोशन पांडे, प्रमोद राऊत, मारोती तिवसकर, उत्तम डांगे, संकेत ढाकुलकर, रवींद्र कारणकर, सुरज कडू आदी पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0