सिंदीरेल्वे,
Hunger strike भाजपाने शेतकर्यांना दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केली नाही. १५ दिवसात सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घ्यावे अन्यथा आपण उपोषणाला बसु असा इशारा बोंडसुला येथील बाबा गलांडे यांनी दिला आहे. सेलू तालुयातील बोंडसुला या खेड्यात शेती करणार्या युवकाने शासनाला सवाल केला की शेतमालाला भाव मिळत नाही, सातबारा कोरा होण्याची चिन्ह नाही.
या भागातील पांढर्या सोन्याला कोणी विचारत नाही, मग शेतकर्यांनी जगायचे कसे? पीक विम्याची रक्कम मिळाली नाही. उद्योगपतींना कर्जमाफी देणार्या सरकारने आमचे कर्ज देखील त्वरित माफ करुन आश्वासनाची पुर्तता करावी. अन्यथा, महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर आपण शेताच्या धुर्यावर Hunger strike सहकुटुंब उपोषणावर बसू असा इशारा निवेदनातून १५ एप्रिल रोजी दिला आहे. निवेदनाच्या प्रति अशोक उर्फ बाबा गलांडे यांनी सेलूचे तहसिलदार, जिल्हाधिकारी, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रवाना केल्या आहेत.