‘इंडियाज गॉट लेटेंट’मुळे माझं आयुष्य बदललं

रणवीर अलाहाबादियाचं भावनिक वक्तव्य

    दिनांक :18-Apr-2025
Total Views |
मुंबई,
Indias Got Latent प्रसिद्ध युट्यूबर आणि कंटेंट क्रिएटर रणवीर अलाहाबादिया उर्फ बीयर बाईसेप्स अलीकडेच ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमुळे चर्चेत आला होता. आता बराच काळ गेला असताना, त्याने अखेर या शोचा त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर काय परिणाम झाला, याबद्दल उघडपणे बोललं आहे.
 

Indias Got Latent  
इन्स्टाग्रामवरील Indias Got Latentप्रश्नोत्तर सत्रात एका फॉलोअरने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रणवीरने भावनिक प्रतिक्रिया दिली. त्याने सांगितलं की, "'इंडियाज गॉट लेटेंट’नंतर माझं आरोग्य बिघडलं, मी आर्थिक नुकसान सहन केलं, अनेक महत्त्वाच्या संधी गमावल्या, माझा सामाजिक आदरही कमी झाला. मानसिक शांतता गमावली. माझ्या पालकांवरही त्याचा परिणाम झाला. खूप काही गमावलं… पण यातून मला खूप काही शिकायलाही मिळालं. माझ्यात आध्यात्मिक वाढ झाली. आता मी जे गमावलं ते परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. कामच माझं उत्तर देईल."
 
 
 मी माझं करिअर लवकर संपवलं
 
या शोमध्ये Indias Got Latent रणवीरने पालकांबद्दल केलेल्या एका वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता आणि हे प्रकरण न्यायालयातही पोहोचलं होतं. त्यावर भाष्य करताना रणवीरने म्हटलं, "माझ्या एका चुकीमुळे माझ्या टीममध्ये काम करणाऱ्या सदस्यांना आणि माझ्या कुटुंबीयांनाही संकटाला सामोरे जावे लागले. लोकांना हे समजत नाही की, अशा प्रकरणांमुळे किती लोकांच्या नोकऱ्या धोक्यात येतात. मी माझं करिअर लवकर संपवलं आणि त्याचवेळी माझ्यासोबत काम करणाऱ्या ३०० हून अधिक लोकांचं करिअरही धोक्यात आलं."माणसांचा स्वभाव काय असतो हे मी या काळात जवळून अनुभवलं. लोकांना एखाद्याला पडताना पाहायला मजा येते. पण वेळ जाईल आणि ते पुढे जातील. मी अजून १००% ठीक झालो नाही. पण आता पुन्हा एकदा सर्व काही धोक्यात घालावं लागेल, कारण अनेक लोकांचं जीवनमान माझ्या कामावर अवलंबून आहे," अशा शब्दांत रणवीरने आपल्या भावना व्यक्त केल्या.ही भावना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असून, अनेकांनी रणवीरला पाठिंबा दर्शवला आहे.