नागपूर,
Ocean swimming competition १९ ते २० एप्रिलदरम्यान होणार्या गोव्यातील करांझालेम बीच येथे ओपन वॉटर स्विमिंग अकादमी व इन्स्टिट्यूट ऑफ वॉटरस्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय समुद्री जलतरण स्पर्धेत अॅक्वा स्पोर्ट्स क्लबचे जलतरणपटू सहभागी होणार आहेत. संजना जोशी खुल्या महिला वयोगटात १० किमी व ५ किमी, स्नेहल जोशी खुल्या महिला वयोगटात १० किमी व ५ किमी, वेद पिंपळकर १७-२४ वर्षे मुलांच्या वयोगटात २ व ५ किमी, कावडे १७-२४ वर्षे मुलींच्या वयोगटात २ किमी, वेदांत येरणे १७-२४ वर्षे मुलांच्या वयोगटात १ किमी, देव्यांशी आष्टनकर ७-१० वर्षे मुलींच्या वयोगटात १ किमी जलतरण स्पर्धेत सहभागी होतील.
या जलतरणपटूंना वरिष्ठ प्रशिक्षक डॉ. प्रवीण लामखडे (एनएसएनआयएस पटियाला) आणि एएससीए लेव्हल -५ प्रशिक्षक विशाल चांदूरकर (फ्लोरिडा, यूएसए) यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण आहे. Ocean swimming competition अॅक्वा स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष मोहन नाहटकर व सचिव मंगेश गद्रे, मिडलँड स्पोर्ट्सचे संचालक प्रशांत उगेमुगे, मिडलँड स्पोर्ट्सचे उपाध्यक्ष प्रीती लांजेकर, व्यवस्थापक अश्विन जनबंधू, त्यांचे पालक, अॅक्वा स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूंचे पालक व क्रीडाप्रेमी यांनी शुभेच्छा दिल्या.