सेवाग्राम,
Seed Festival माणसाचा हव्यास विनाशाकडे नेणारा ठरत आहे. आधुनिक काळात मानवीय जीवनशैली बदलली आहे. प्रामाणिकता, नैतिकता राहिली नसल्यामुले संकटं उभे झाले. मानविय जीवनासाठी आवश्यक असलेले नैसर्गिक स्त्रोत बाधित झाल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. यातून वाचण्यासाठी मानवीय जीवनशैली परिवर्तनासाठी पारंपरिक शेती पद्धती शिवाय समृद्धी येणे शय नाही असे प्रतिपादन गुजरातचे शेती अभ्यासक धिरेन सोनी यांनी केले.

स्थानिक नई तालिम समिती परिसरात नई तालिम समिती, व बीजोत्सव समूह यांच्या संयुत वतीने आयोजित सेवाग्राम बीजोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आज १८ रोजी ते बोलत होते. याप्रसंगी लातूरचे डॉ. महादेव पाचेगावकर, यवतमाळचे पद्मश्री सुभाष शर्मा, डॉ. उल्हास जाजू आदींची उपस्थिती होती. Seed Festival धीरेंद्र सोनी यांनी विकासाच्या नावावर परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण हे परिवर्तनामुळे पर्यावरण सुधारत असल्याचे दिसून येत आहे. विकास ग्लोबल वॉर्मिंग समस्येला वाढवणारी ठरत आहे. आपण ज्या वस्तूंचा उपभोग घेत आहोत त्यावर चिंतन होणे गरजेचे आहे. गांधीजींनी नई तालिम दिली आहे. त्यावर विचार करण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले.
सुभाष शर्मा यांनी वातावरणातील बदल, सेंद्रिय शेती, पाणी डार्क झोन आणि पर्यावरण याला जबाबदार घटकांची माहिती दिली. यातून वाचण्यासाठी नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करावा लागेल. पाण्याचे स्त्रोत, जमिनीत पाणी मुरवणे, पर्यावरण समृद्ध करण्यासाठी पारंपरिक शेतीचा उपयोग करावा लागेल. आरोग्य समस्या वाढत आहे शेती, शेतकरी वाचला पाहिजे यासाठी ग्राहक चळवळ उभारणे गरजेचे आहे. Seed Festival सरकारवर ग्राहकांनी दबाव निर्माण केला पाहिजे आणि याची सुरुवात बीजोत्सवाच्या चिंतन, मंथनातून झाली पाहिजे, असे सांगितले. डॉ. महादेव पाचेगावकर यांनी बीजोत्सवाची गरज प्रतिपादन केले. प्रास्ताविक नयी तालिम समितीचे मंत्री प्रा. डॉ. प्रभाकर पुसदकर यांनी केले. या महोत्सवात महाराष्ट्रासह तामिळनाडू, उत्तर प्रदेश, हरयाणा आदी राज्यातील शेतकरी, संस्था प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.