आमिर खानचा 'सितारे जमीन पर' २० जूनला प्रदर्शित

18 Apr 2025 13:59:49
Sitaare Zameen Par बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान काही काळ अभिनयापासून दूर होता. 'लाल सिंग चड्ढा'नंतर त्याने अभिनयात विश्रांती घेत चित्रपट निर्मितीकडे अधिक लक्ष दिले. मात्र आता तो पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर 'सितारे जमीन पर' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 
 
Sitaare Zameen Par
या चित्रपटाची Sitaare Zameen Par घोषणा गेल्या वर्षीच करण्यात आली होती. सुरुवातीला 'सितारे जमीन पर' ३० मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र आता त्याची नवीन रिलीज डेट जाहीर झाली आहे. 'पिंकव्हिला'च्या वृत्तानुसार, हा चित्रपट आता २० जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रदर्शनाच्या नव्या तारखेमुळे आमिर खानला बॉक्स ऑफिसवर कोणत्याही मोठ्या चित्रपटाशी टक्कर द्यावी लागणार नाही, आणि दोन आठवड्यांचा चांगला स्क्रीन स्पेस मिळण्याची शक्यता आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, निर्माते 'रेड २' या चित्रपटासोबत 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर प्रदर्शित करण्याची योजना आखत आहेत. त्यामुळे १ मे २०२५ रोजी ट्रेलर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मात्र यासंबंधी अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही, त्यामुळे यात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
 
आमिर खानचे आगामी चित्रपट
 
 
'सितारे जमीन पर' Sitaare Zameen Par व्यतिरिक्त आमिर खान अजून काही महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. तो राज कुमार संतोषी दिग्दर्शित विनोदी चित्रपटात झळकणार आहे. त्याचबरोबर लोकेश कनागराज यांच्या सुपरहिरो बेस्ड चित्रपटातही आमिरची प्रमुख भूमिका असणार आहे. याशिवाय, सनी देओलसोबत 'लाहोर १९४७' या ऐतिहासिक पार्श्वभूमीवरील चित्रपटातही तो दिसणार असून, हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.चित्रपटसृष्टीत अनेक वर्षांपासून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आमिर खानचे पुनरागमन प्रेक्षकांसाठी नक्कीच आनंदाची बाब आहे. आता 'सितारे जमीन पर' त्याच्या चाहत्यांच्या अपेक्षा किती पूर्ण करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0