सिंदी (रेल्वे),
Stolen sand मतदार संघातील मोठ्या लोकप्रतिनिधीचा विश्वासू कार्यकर्ता अमोल गवळी आणि त्याचा सहकारी संदीप सोनटक्के यांच्या मालकीचे तीन टॅटर चोरीच्या रेतीची अवैध वाहतूक करताना शहरातील कांढळीमार्गावर सिंदी(रेल्वे) पोलिसांनी पकडल्याने शहरात खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, कांढळी नदीवरील हत्तीगोठा घाटातून अनेक दिवसांपासुन रेती माफीया सरार्स रेतीची चोरी करुन शासनाच्या करोडो रुपयांच्या महसूलाला चुना लावत आहे. रेतीला प्रचंड मागणी असल्याने चढ्या दराने विकुन मस्त पैसा कमविण्याचा गोरखधंदाच अनेकांनी उघडला आहे. शहरात बांधकाम जोरात सुरू असुन कोणताही रेती घाट लिलाव झाला नसताना रेती पुरविल्या जात आहे. हा रेतीचा गोरखधंदा सर्व सामान्य नागरिकांना दिसतो तर महसूल अधिकार्यांना का दिसत नाही हा संशोधनाचा विषय आहे.

सिंदी (रेल्वे) पोलिस ठाण्याचे नवनियुत ठाणेदार नरेंद्र निस्वादे यांनी धडक कारवाई करीत एच. एच. ३२ ए.एच ७४२६ ट्रॅटर व ट्रॉली क्र. एम. एच. ३२ ए. एच. ६५३० चा चालक सुरज हेपट (२५), रा. परसोडा ता. समुद्रपूर तसेच मालक अमोल गवळी रा. सिंदी रेल्वे एम. एच. ३२ ए.एच. ६९२२ क्रमांकाचा ट्रॅटर व एम.एच. ३२ ए. एच. ६९२३ क्रमांकाची ट्रॉलीचा चालक गणेश सुरजुसे (२७) रा. सिंदी रेल्वे, एम.एच. ३२ ए. एस. ९८४६ क्रमांकाचा ट्रॅटर व एम. एच. ३२ ए. एच. २९२७ क्रमांकाच्या ट्रॉलीचा चालक राहुल गवळी (३०) रा. सिंदी रेल्वे दोन्ही टॅटर व ट्रॉलीचे मालक संदीप सोनटक्के (४०) रा. सिंदी रेल्वे या पाच चालक/मालकांवर अवैधरीत्या रेती चोरीचा गुन्हा नोंदवुन तिन्ही ट्रॅटर रेतीसह जप्त करून पोलिस स्टेशन सिंदी येथे जमा केले. Stolen sand ही कारवाई ठाणेदार नरेंद्र निस्वादे, हवालदार चंद्रकांत भावरे, समीर आगे, सचिन उईके, प्रदीप मस्के यांनी केली. सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकार्यांवर अशा प्रकारची पहिलीच कारवाई असल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.