स्टंटबाजी करण्यात गेला महिलेचा जीव

18 Apr 2025 21:54:17
तळेगाव,
Woman's life lost in stunt गावात कायम स्टंटबाजी करीत दुचाकी चालवणार्‍याने दुसर्‍या दुचाकीला दिलेल्या धडकेत स्टंटबाजाच्या दुचाकीवर असलेल्या महिलेचा मृत्यू झाला. या प्रेमाच्या प्रवासात चिमुकली आईला पोरकी झाली. मिळालेल्या माहितीनुसार तळेगाव येथील चेतन बनगरे व मोनिका गायकवाड (२८) रा. काकडदरा हे दोघे तळेगावकडून आर्वीकडे एम. एच. ३२ एएल ९७५५ क्रमांकाच्या सुसाट दुचाकीने तळेगावकडून आर्वीकडे जात असताना यांची दुचाकी एम. एस. २७ सी. एन. ०५८५ क्रमांकाच्या दुचाकीवर धडकली. यात चेतन यांच्या दुचाकीवर असलेली मोनिका रस्त्यावर पडली.
 
 
६
 
जखमींना नागरिकांनी आर्वी रुग्णालयात दाखल केले असता डॉटरांनी मोनिकाला मृत घोषित केले तर चेतनला अमरावती येथे उपचाराकरिता दाखल केले परंतु प्रकृती गंभीर असल्याने नागपूर रुग्णालयात दाखल केले. मोनिकाला लहान मुलगी आहे. चेतन नेहमीच गावात स्टंटबाजी करीत वाहन चालवत होता. Woman's life lost in stunt त्याच्यावर या स्टंटबाजीवर पोलिसांनी यापूर्वीच कारवाई केली असती तर हा अपघात झाला नसता अशी गावात चर्चा आहे. या प्रकरणी तळेगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आली असुन पुढील तपास सुरू आहे.
 
Powered By Sangraha 9.0