जालंध,
jatt movie बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘जात’ हा चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटातील एका दृश्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत जालंधर येथील सदर पोलीस स्टेशनमध्ये अनेक कलाकार व निर्मात्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्टिमेटम
या jatt movie प्रकरणात सनी देओल, रणदीप हुड्डा, विनीत कुमार सिंग यांच्यासह दिग्दर्शक गोपीचंद मालिनेनी आणि निर्माते नवीन मालिनेनी यांची नावे आहेत. फोल्डीवाल गावातील रहिवासी विकल गोल्ड यांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय दंड संहितेच्या कलम २९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारीनुसार,jatt movie ‘जात’ चित्रपटातील एका दृश्यामुळे ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावल्या असून, त्यात त्यांच्या धार्मिक स्थळांचा अनादर करण्यात आला आहे, तसेच त्यांच्या धर्माचे नकारात्मक चित्रण करण्यात आले आहे. विकल गोल्ड यांनी यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी करत दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर पोलिस आयुक्त कार्यालयाबाहेर निदर्शनेही करण्यात आली.
६१.५० कोटी रुपयांचा गल्ला
दरम्यान, या प्रकरणावर चित्रपटाशी संबंधित कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. कुणीही माफी मागितलेली नाही किंवा आपली बाजू मांडलेली नाही.‘जात’ चित्रपट १० एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. १०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अद्याप १०० कोटींचा टप्पा पार करू शकलेला नाही. आतापर्यंत केवळ ६१.५० कोटी रुपयांचा गल्ला या चित्रपटाने जमवला असून, तो अपयशी ठरल्याचे बोलले जात आहे.तथापि, सनी देओलने नुकत्याच एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे ‘जात २’ ची अधिकृत घोषणा केली आहे. “जात एका नव्या मोहिमेवर आहे,” असे सांगत तो लवकरच नव्या भागात परतणार असल्याचे त्याने सांगितले. या सिक्वेलचे दिग्दर्शनही गोपीचंद मालिनेनी करणार असून, मैथ्री मूव्ही मेकर्स त्याची निर्मिती करणार आहेत. मात्र, सनी देओलव्यतिरिक्त इतर कलाकार कोण असतील, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.