तभा वृत्तसेवा
हिंगणघाट,
Illegal sand mining हिंगणघाट तालुयातील शेकापूर (बाई) व दारोडा येथील नदी घाटावरून अनेक महिन्यापासून अवैध रेती उत्खनन सुरू आहे. रोज शंभरावर टिप्पर भरून रेती बाहेर जातं असूनही आजवर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होतं नसल्याने तहसीलदार हिंगणघाट यांच्या कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा वर्धा जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण उपासे यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिलेला आहे.

जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात नमुद केल्यानुसार अवैधरित्या टिप्परद्वारे रेती उचलून लाखो रुपयाचा महसूल बुडत असताना प्रशासन मात्र ठिम्म आहेत. प्रशासनातील एक वरिष्ठ अधिकारी यांच्या संगनमताने हा अवैध व्यवहार सुरू असून हे करणारे कोण व्यक्ती आहेत याची प्रशासनाला चांगली जाणीव आहे. Illegal sand mining परिसरातील गावकर्यांचा याला प्रचंड विरोध असूनही हा अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याने एखादे वेळी जन असंतोष निर्माण होऊ शकतो व त्यातूनच बीड सारखी घटना होऊ नये यासाठी महसूल प्रशासनाने वेळीच जागरूक राहून या प्रकरणाची दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. निवेदन देताना प्रवीण उपासे यांच्या सोबत धर्मपाल ताकसांडे, गुणवंत कोठेकर, कपिल रेवतकर, राहुल कोळसे, चेतन वैरागडे, सागर वाघमारे, प्रवीण भाईमारे, बिट्टू श्रावणे, नाथ ठोंबरे, दादू कटारे, साहिल रघाटाटे, विशाल पंडित, पवन कटारे, सुरज वाघमारे, कुणाल बोबाटे, आशिष डंभारे, मिलिंद डफ अण्णा मोरे आदी उपस्थित होते.