विलास नवघरे
गिरड,
Installation of the idol वर्धा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गिरड येथे २०९ वर्षांपूर्वी बांधलेल्या प्राचीन श्रीराम मंदिराने तिसर्या शतकात पदार्पण केले आहे. सीताराम महाराजांनी आपल्या झोपडीत लाकडापासून बनवलेल्या श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना केली होती. येथील घोडा यात्रा बघण्यासाठी विदर्भातून हजेरी लावतात. आाता मात्र संगमरवराच्या आकर्षक मुर्ती मंदिरात बसवण्यात आल्या आहेत.

येथे पैठणहून आलेल्या संत सीताराम महाराजांचा मठ होता. १८१५ मध्ये सीताराम महाराजांनी मठाचे श्रीराम मंदिरात रूपांतर केले. २०९ वर्षांपासून पूजापाठ अखंड सुरू आहे. १३९ वर्षांपूर्वी येथे रामनवमीनिमित्त घोडायात्रेला प्रारंभ झाला. १८१२ मध्ये सीताराम महाराज प्रवास करीत पैठण गावातून गिरड येथे आले. Installation of the idol त्यांना गिरड आवडले आणि त्यांनी गोपाळकृष्ण मंदिराजवळ गवताची झोपडी करून रामभक्ती सुरू केली. महाराजांनी येथे ३० वर्षे भिक्षा मागून वास्तव्य केले. सीताराम महाराजांनी आपल्या झोपडीत लाकडापासून बनवलेल्या श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना केली. ४० वर्षांनंतर त्यांनी येथे देहत्याग केला. त्यांच्या मृत्यूपूर्वी महाराज परमहंसांनी दिक्षा दिली.
श्रीराम जन्मोत्सवाची परंपरा पार पाडण्यासाठी जबाबदार असलेल्या रामकृष्ण महाराजांनी या मंदिराच्या सेवेसाठी अखंड ३० वर्षे तपस्या करून सिद्धी प्राप्त केली व राम मंदिराची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. Installation of the idol मंदिराच्या बांधकामासाठी पैशाची गरज होती. Installation of the idol मंदिराला दान केलेला शेतमाल विकून मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. १८९८ मध्ये बाजीराव महाराजांनी समाधी घेतली. त्यानंतर त्यांचे शिष्य मंसाराम महाराजांनी १० वर्षे या मंदिराचे काम हाती घेतले आणि त्यांनी आपले शिष्य मंसाराम महाराज यांना आपला उत्तराधिकारी घोषित केले.
रात्रदिवस परिश्रम करून या मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यास २४ वर्षे लागली. त्यानंतर रूपराम महाराज, रतीराम महाराज, अनंतदास महाराज, रामदास शास्त्री महाराज आदींनी या मंदिराचा कारभार हाती घेतला आणि १९६६ पासून विश्वस्थ मंडळाची स्थापना झाली. शेतीच्या उत्पन्नावर रामजन्मोत्सव, घोडायात्रा उत्सव साजरा केला जातो. Installation of the idol हे मंदिर आजही नवीनच आहे. आधुनिकता आणि हायटेक युगातही राम जन्मोत्सव व घोडायात्रेत दरवर्षी हजारो रामभक्त सहभागी होतात.