एमटीडीच्या चौथ्या शाखेचे उद्घाटन

    दिनांक :02-Apr-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
वर्धा,
MTD branch inauguration ७० वर्षाची परंपरा, शुद्धेत्तेची हमी आणि हजार समाधानी ग्राहकांचा विश्वास म्हणजेच मनोहर तुकारामजी ढोमणे ज्वेलर्स यांच्या चौथ्या शाखेचे उदघाटन २३ व २४ मार्च रोजी हिंगणघाट येथे करण्यात आले. हिंगणघाट येथे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते २३ रोजी उद्घाटन झाले. यावेळी हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी, शरद पवार राकाँ गटाचे प्रदेश सचिव अतुल वंदिले, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी उपस्थित होते तर मराठी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी २४ रोजी शाखेचे उदघाटन केले.
 
 
MTD branch
 
दोन्ही दिवशी हिंगणघाट येथील स्थानिय लोकांचा जोरदार प्रतिसाद लाभला. उद्घाटनानिमित्त दोन्ही दिवशी आकर्षित ऑफर देण्यात आली. तेजश्री प्रधान यांनी दागिन्यांची प्रशंसा केली. दागिन्यांनी सर्व्यांचे लक्ष वेधून घेतले तसेच अजय मोहिते यांनी पुष्पाच्या भूमिकेत सर्वांना आकर्षित केले. MTD branch inauguration २३ मार्चपासुन मनोहर तुकारामजी ढोमणे ज्वेलर्स हिंगणघाट येथे आपल्या सेवेत आहे. जल्लोष, आनंद, प्रेम व सर्व्यांच्या आशिर्वादाने हे समारंभ पार पडले अशे मनोहर तुकारामजी ढोमणे ज्वेलर्स याचे प्रमुख सौरभ ढोमणे यांनी कळवले आहे.