तभा वृत्तसेवा
वर्धा,
Pankaj Bhoyar आदिवासीबहूल गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासोबतच त्यांच्या गावाचा विकास करण्यासाठी शासनाने ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजना अंमलात आणली आहे. या योजेनेंतर्गत जिल्ह्यातील आदिवासीबहूल गावांच्या विकासासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकारामुळे १४ कोटी ५९ लाख ६९ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्यातील आदिवासी समाज हा जंगल व्याप्त व दुर्गम भागात वास्तव्यास असल्याने या भागाचा विकास पाहिजे त्या प्रमाणात झाला नव्हता.

आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दलित वस्ती कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्य शासनाने आदिवासीबहुल गावांचा विकास करण्यासाठी ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा एकात्मिक कार्यक्रम राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला. सन २००४-०५ पासून ही योजना राज्यात राबविण्यात येत आहे. Pankaj Bhoyar राज्यातील अकोला, वर्धा, भंडारा, रायगड, जळगाव, नंदूरबार, धुळे, पुणे, नागपूर, अहिल्यानगर, यवतमाळ, नांदेड, बुलढाणा, अमरावती व गोंदिया या जिल्ह्यात आदिवासी समाजाची संख्या मोठी असल्याने ही योजना या जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. सन २०२४-२५ या वर्षासाठी या गावातील पायाभूत सुविधांसाठी ३९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यासाठी १४ कोटी ५९ लाख ६९ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून १९५ कामे करण्यात आली आहे. या कामांपैकी अनेक कामे पुर्णत्वास आली असून काही कामे प्रगतीपथावर आहे.
योजनेतंर्गत केली जाणारी कामे
ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेतंर्गत आदिवासी बहुल गावातील नागरी सुविधा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतो. Pankaj Bhoyar यामध्ये गाव व परिसरातील रस्ते, सांडपाणी, नाल्या, समाज मंदिर, स्मशानभूमी शेड व अन्य नागरी सुविधांची कामे करण्यात येतात. या योजनेमुळे आदिवासीबहुल क्षेत्राचा विकास झपाट्याने होत आहे.