तभा वृत्तसेवा
गिरड,
Release of animals for slaughter कोरा टी-पॉईंट नजिकच्या शेतात अवैध जनावरं मोठ्या प्रमाणात जमा करून ती कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत ४७ जनावरांची सुटका करीत १२ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, यातील १ बैल व २ गोर्ह्यांचा मृत्यू झाला. या कारवाईत चौघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना आज २ रोजी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार १ रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास गिरडचे ठाणेदार विकास गायकवाड यांंना कोरा टी-पॉईंटवरील अजाब डुकरे यांच्या शेतातून वाहनात जनावरं कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती मिळाली. ठाणेदार गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक गोमेद पाटील यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचला. Release of animals for slaughter यावेळी अनूप पाटील, शेख वसिम शेख वहिद दोन्ही राहणार कामठी नागपूर, निकेश डुकरे रा. नारायणपूर, सुबेर यासिम कुरेशी रा. टेकानाका नागपूर हे शेतात बांधून असलेल्या जनावरांना एम. एच. ४९ बी. झेड. ६९९१ क्रमांकाच्या वाहनात कोंबताना आढळून आले.
यावेळी घटनास्थळी १ बैल व २ गोर्हे मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांनी ४४ जनावरांना ताब्यात घेऊन जीवनरक्षक फाऊंडेशन हिंगणघाट यांच्या स्वाधीन केले. Release of animals for slaughter पोलिसांनी चौघांना अटक करून त्यांच्या ताब्यातून १२ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार विकास गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक गोमेद पाटील, गणेश झाडे, अमर धोटे यांच्यासह गृहरक्षक दलाच्या कर्मचार्यांनी केली आहे.