नवी दिल्ली,
Arvind Kejriwal दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल सध्या राजकीय कारणांपेक्षा त्यांच्या खासगी आयुष्यातील एका आनंदाच्या प्रसंगामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या एकुलत्या एक मुलीचा – हर्षिता केजरीवाल Harshita Kejriwal हिचा विवाह १८ एप्रिल रोजी दिल्लीतील कपूरथळा हाऊसमध्ये पार पडला. या समारंभात केजरीवाल आणि त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी 'पुष्पा २' चित्रपटातील 'अंगारों का अंबर सा' या गाण्यावर केलेल्या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर Social media तुफान व्हायरल झाला आहे.

१७ एप्रिल रोजी दिल्लीच्या प्रतिष्ठित शांग्री-ला हॉटेलमध्ये हर्षिता आणि संभव जैन यांचा साखरपुडा पार पडला. यावेळी अरविंद केजरीवाल हलक्या हिरव्या रंगाचा कुर्ता परिधान करून पत्नी सुनीता यांच्यासोबत डान्स फ्लोअरवर थिरकताना दिसले. पाहुण्यांनीही टाळ्यांच्या गजरात या आनंददायी क्षणाचा आस्वाद घेतला. सोशल मीडियावर या व्हिडिओला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, लाखो लोकांनी तो पाहिला आणि शेअर केला आहे.विवाहाच्या दिवशी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही आपली खास उपस्थिती नोंदवली. दुसऱ्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये, ते ढोल-ताशांच्या तालावर भांगडा करताना दिसून आले. त्यांच्या उत्साही शैलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, सोशल मीडियावर त्यांचेही भरभरून कौतुक होत आहे.
कोण आहे मुलगा ?
हर्षिता केजरीवाल Harshita Kejriwal आणि संभव जैन Sambhav Jain हे आयआयटी दिल्लीमध्ये शिकताना एकमेकांच्या संपर्कात आले होते. हर्षिताने केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली असून, संभव हे सध्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी नुकतेच 'बेसिल हेल्थ' नावाचे आरोग्यसेवा स्टार्टअप सुरू केले आहे, जे तंत्रज्ञानाच्या आधारे वैयक्तिकृत जेवण योजना देण्यावर लक्ष केंद्रीत करते.या खासगी विवाह समारंभाला माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, खासदार संजय सिंह, खासदार राघव चढ्ढा आणि आप पक्षाचे इतर अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. मनीष सिसोदिया भावुक होत म्हणाले, "हर्षिता आमची मुलगी आहे. हे लग्न म्हणजे आमच्या संपूर्ण आप कुटुंबासाठी आनंदाचा प्रसंग आहे. मी देवाकडे तिच्या आणि संभवच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करतो." तर संजय सिंह म्हणाले, "अशा कठीण काळात आनंदाचे हे क्षण खूपच मोलाचे असतात."
हर्षिता आणि संभव यांचा विवाह अत्यंत खासगी आणि पारंपरिक वातावरणात पार पडला असून, नातेवाईक आणि जवळच्या मित्रांच्याच उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला.