डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट

सुसाइड नोटमध्ये मनीषा मुसळे-मानेचे नाव, पोलिसांनी केली अटक

    दिनांक :20-Apr-2025
Total Views |
सोलापूर,
Dr Shirish Valsangkar suicide सोलापूर शहराला हादरवून सोडणाऱ्या प्रसिद्ध न्युरो फिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मोठा खुलासा समोर आला आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी मनीषा मुसळे-माने हिच्यावर थेट आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलं आहे.
 
 

Dr Shirish Valsangkar suicide  
पोलिसांनी दिलेल्या Dr Shirish Valsangkar suicide माहितीनुसार, मनीषा मुसळे-माने ही वळसंगकर यांच्या रुग्णालयात प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होती. तिच्याच वागणुकीमुळे वळसंगकर तणावात होते, असे सुसाईड नोटमध्ये नमूद आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत रात्रीच न्यायालयाची परवानगी घेऊन तिची अटक केली आहे.रुग्णालयातील आर्थिक व्यवहारांचे लिखित नोंद ठेवण्यावर डॉ. वळसंगकरांचा कटाक्ष होता. मात्र, काही व्यवहार हे बिननोंद पद्धतीने होत असल्याने त्यांनी त्यावर आक्षेप घेतला होता. याच पार्श्वभूमीवर संबंधित महिलेला नोकरीवरून कमी करण्यात आले. त्यानंतर तिने आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे डॉ. वळसंगकर अधिकच तणावात गेले होते. जवळच्या व्यक्तींनी पोलिसांत तक्रार देण्याचा सल्ला दिला होता, मात्र त्यांनी तो टाळला.
 
घटनेचा थरारक क्रम
 
शुक्रवारी (१८ एप्रिल) Dr Shirish Valsangkar suicide रात्री ८ वाजता डॉ. वळसंगकर रुग्ण तपासून घरी परतले. ८:३० च्या सुमारास त्यांच्या बेडरूमच्या बाथरूममधून बंदुकीचा आवाज आला. दोन फायरच्या आवाजाने घरात एकच खळबळ उडाली. कुटुंबीयांनी तातडीने धाव घेतली असता, ते रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. तातडीने त्यांच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान रात्री १०:२० वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.
 
कोण होते डॉ. शिरीष वळसंगकर?
 
डॉ. वळसंगकर Dr Shirish Valsangkar suicide हे सोलापुरातील नामांकित न्युरोफिजिशियन होते. वयाच्या ६९व्या वर्षी त्यांनी आयुष्याचा शेवट असा टोकाचा निर्णय घेतल्याने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांनी S.P. Institute of Neurosciences या आधुनिक रुग्णालयाची स्थापना केली होती. MBBS आणि MD नंतर त्यांनी लंडनमधून MRCP (UK) ही पदवीही मिळवली होती. मेंदू विकारांवरील उपचारात त्यांचे योगदान मोठे होते. देशभरात त्यांची ख्याती होती. वैद्यकीय सेवेसोबतच वैमानिकतेचीही त्यांना आवड होती. त्यांनी स्वतःचे विमान खरेदी करून भारतात प्रवास केला होता आणि अनेकांना वैमानिक प्रशिक्षण दिले होते.
 
पोलिस तपास सुरू
 
या प्रकरणी पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास सुरू असून सुसाईड नोटचा सखोल अभ्यास, घटनास्थळाची पाहणी आणि जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. आरोपी महिलेला न्यायालयीन कोठडीत देण्यात आले आहे.