नागपूर,
Pink e rickshaw महाराष्ट्र शासनाने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने विविध निर्णय घेतले असून त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. महिला व बाल विकास विभागाच्या वतीने महिलांद्वारे महिलांसाठी संचालित पिंक ई-रिक्षा याेजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण व त्यांच्या सुरक्षेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडल्याचे प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राज्य शासनाच्या महिला व बाल Chief Minister Devendra Fadnavis विकास विभागार्ते नियाेजन भवनात पिंक ई-रिक्षा याेजनेंंतर्गत त्या नागपूर जिल्ह्यातील 50 पात्र महिलांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आल्या. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना साकाेरे- बाेर्डीकर, आ. संदीप जाेशी व डाॅ. आशीष देशमुख, महिला व बालविकास विभाग सचिव डाॅ. अनुपकुमार यादव, महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर, महामेट्राेचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर उपस्थित हाेते.
मुख्यमंत्री Chief Minister Devendra Fadnavis म्हणाले, महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध असून विविध याेजनांच्या माध्यमातून हे कार्य प्रभावीपणे सुरू आहे. महिला व बालविकास विभागाने पिंक ई-रिक्षा या महत्त्वाकांक्षी याेजनेच्या माध्यमातून गरजू महिलांना राेजगार उपलब्ध करून दिला आहे. कामकाजी महिलांना या महिलांच्या ऑटाे रिक्षामध्ये सुरक्षित प्रवास करण्याची हमीही या याेजनेने दिली आहे. विविध मेट्राे स्टेशनवर प्रवाशांना फिडरसेवा उपलब्ध करून देण्यासाठी महिला व बाल विकास विभाग आणि महामेट्राेत करार झाला आहे. पर्यटन विभागासह अन्य विभागासाेबत भविष्यात असे करार करून राेजगार उपलब्ध करून देण्यात येईल.
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, आठ जिल्ह्यात ही याेजना असून पहिल्या टप्प्यात सहा महिन्यात पाच हजार वितरित करण्याचे उद्दिष्ट आहे. या महिलांना किमान दहा दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. पाच वर्षांचा रिक्षाचा मेंटेनन्स व चार्जिंगची व्यवस्थाही करून देण्यात आली आहे. प्रतिनिधिक स्वरूपात 11 पात्र महिलांना ई-रिक्षाच्या चाव्या वितरित करण्यात आल्या.
मुख्यमंत्र्यांनी केला पिंक-ई- रिक्षातून प्रवास
मुख्यमंत्री Pink e rickshaw देवेंद्र फडणवीस यांनी सन्यालनगरातील पूजा नरेंद्र वानखेडे यांच्या पिंक ई-रिक्षातून महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना साकाेरे- बाेर्डीकर यांच्यासह प्रवास केला. या पिंक ई रिक्षाचे पहिले प्रवासी हाेण्याचा मान मिळवत त्यांनी महिलांना विश्वासही दिला.
महत्त्वाकांक्षी याेजना
महत्त्वाकांक्षी पिंक ई-रिक्षा याेजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यात 2 हजार पिंक ई-रिक्षा वितरित हाेणार आहेत. यासाठी 20 ते 50 वयाेगटातील इच्छुक महिलांचे 2040 अर्ज असून त्यापैकी जिल्हाधिकाèयांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने 1032 लाभार्थ्यांना मंजुरी दिली. पुणे, नाशिक, नागपूर, अहल्यानगर, अमरावती, संभाजीनगर, साेलापूर, काेल्हापूर या आठ जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व ई-रिक्षा चालवण्यासाठी साेयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.