रेसिंगमध्ये अजित कुमारचे यशस्वी पुनरागमन

स्पा-फ्रँकोरचॅम्प्स सर्किटमध्ये पटकावले दुसरे स्थान

    दिनांक :21-Apr-2025
Total Views |
बेल्जियम,
Actor Ajith Kumar पडद्यावर आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या अभिनेता अजित कुमारने आता रेसिंग ट्रॅकवरही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. बेल्जियममधील प्रतिष्ठित Spa-Francorchamps Circuit स्पा-फ्रँकोरचॅम्प्स सर्किटमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय शर्यतीत त्याने दुसरे स्थान पटकावत मोठे यश मिळवले. अनेक अपघातांनंतर केलेले हे पुनरागमन खरोखरच प्रेरणादायी ठरले आहे.
 

Actor Ajith Kumar 
 
 
व्हायरल
या यशानंतर अजित कुमारभोवती चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. तो तिरंगा हातात धरून व्यासपीठावर उभा असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहत्यांसह इंडस्ट्रीतील सहकलाकार, दिग्दर्शक आणि त्याच्या टीमनेही या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष केला.
‘गुड बॅड Actor Ajith Kumar अग्ली’चे दिग्दर्शक आदिक रविचंद्रन यांनी म्हटले, “भारतीय मोटरस्पोर्टसाठी हा खरोखरच अभिमानाचा क्षण आहे. अजित सर आणि त्यांच्या टीमचे मनापासून अभिनंदन.”अजितचे मॅनेजर सुरेश चंद्र यांनीही भावना व्यक्त करत सोशल मीडियावर लिहिले, “बेल्जियममधील स्पा-फ्रँकोरचॅम्प्स सर्किटवर अजित कुमार आणि त्यांच्या टीमने P2 पोडियममध्ये शानदार कामगिरी केली. हा मोटरस्पोर्टसाठी एक अभिमानाचा क्षण आहे.” त्यांनी अजित कुमार आणि टीमच्या आनंदी क्षणाचा एक व्हिडिओही शेअर केला.
रेसदरम्यान अजित कुमारने आपल्या समोर असलेल्या रेसर्ससाठी टाळ्या वाजवत दिलखुलासपणे सन्मान दिला आणि अनेकांचे मन जिंकले. काही दिवसांपूर्वी स्पेनमध्ये सराव करताना त्याला दोन वेळा अपघातांना सामोरे जावे लागले होते. तरीही त्याने हार न मानता आपल्या धैर्य आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले.अजित कुमारने आणखी एकदा दाखवून दिले की तो केवळ पडद्यावरच नाही, तर खऱ्या आयुष्यातही एक खरा हिरो आहे.