ई-स्कूटर सेवा पुढील महिन्यापासून सुरू होणार

मेट्रो स्थानकांवर चार्जिंग स्टेशनची सुविधा

    दिनांक :21-Apr-2025
Total Views |
नागपूर,
E-scooter मेट्रो स्थानकापर्यंत कमी पैश्यात पोहोचण्यासाठी आता आठ प्रमुख मेट्रो स्थानकांवर ई-स्कूटर सेवा सुरू केल्या जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ४० ई-स्कूटर्स लोकमान्य नगर, खापरी, जयप्रकाश नगर, गड्डी गोदाम, ऑफ इंजिनिअरिंग, अजनी, रहाटे कॉलनी, विमानतळ मेट्रो स्थानकांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
 
 

E-scooter  
 
 
टॅक्सी किंवा ऑटोपेक्षा स्वस्त
मुख्यत: E-scooter ई-स्कूटर ही बॅटरीवर चालणारी आहेत, यामुळे प्रदूषण होणार नाही तसेच पर्यावरणाला फायदा होईल. ही सेवा पारंपारिक टॅक्सी किंवा ऑटोपेक्षा स्वस्त राहणार असल्याने नागपुरातील प्रवाशांचा प्रवास खर्च कमी होईल. नागरिक त्यांच्या वेळेनुसार गरजेनुसार मेट्रो स्थानकांवर ई-स्कूटर सेवेचा लाभ भाड्याने घेऊ शकतील. शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ई-स्कूटर सेवा लाभदायक ठरणार आहे.
 
 
’स्विच ई-राइड अ‍ॅप’
 
नागपूर मेट्रो प्रशासनाने शहरातील आठ प्रमुख मेट्रो स्थानकांवर ई-स्कूटर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना शेवटचा माईल कनेक्टिव्हिटी प्रदान करणे, त्यांना मेट्रो स्थानकापर्यंत सहज पोहोचणे तसेच त्यांच्या जलद आणि आर्थिकदृष्ट्या पोहोचणे हा या नवीन उपक्रमाचा उद्देश आहे. ई-स्कूटर सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना त्यांच्या ’स्विच ई-राइड अ‍ॅप’ डाउनलोड करावे लागेल. अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर प्रवाशांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करून मंजुरी घ्यावी लागेल. मंजुरी मिळाल्यानंतर ते या ई-स्कूटर्सचा वापर करू शकतील. यासाठी भाडे १.५० रुपये प्रति मिनिट असेल, जे किंवा टॅक्सीच्या तुलनेत खूपच किफायतशीर ठरणार आहे.प्रवाशांची आणि सुविधा लक्षात घेऊन ई-स्कूटरमध्ये अनेक आधुनिक वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना इमर्जन्सी एसओएस बटण वापरून तात्काळ मदत मिळू शकते. प्रत्येक स्कूटरमध्ये जीपीएस ट्रॅकर बसवण्यात येणार असून, त्याद्वारे स्कूटरचे लोकेशन कळू शकते.
 
स्कूटरची चाचणी
 
ई-स्कूटरकरिता चार्जिंग स्टेशन बांधण्याचे काम सुरू असून अ‍ॅप आणि स्कूटरची चाचणी यशस्वी झाली असल्यामुळे मे महिन्यात ही सेवा नागरिकांसाठी सुरू होईल, अशी माहिती ई-स्कूटर सेवा कंपनीच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. मेट्रोची ही योजना यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून, आगामी काळात ही सेवा इतर स्थानकांवर आणि ठिकाणीही विस्तारित केली आहे. नागपूर मेट्रोचा हा उपक्रम शहरवासीयांसाठी वरदान ठरणार आहे.