कारंजा लाड,
Karnaja laad Accident समोरील रेतीचा भरधाव ट्रक नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर घसरला त्यामुळे मागील ट्रक त्या ट्रकला धडकल्याने घडलेल्या अपघातात यातील एका ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला. नागपूर संभाजी नगर द्रुतगती मार्गावरील कारंजा शहरा नजीकच्या सावरकर चौकात रविवारी मध्यरात्रीनंतर अडीच वाजता ही घटना घडली. विनोद यादव असे जखमी चालकाचे नाव असून, तो भिलाई येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे.
तर रेतीच्या ट्रकवरील चालक फरार झाला. सूत्रांच्या माहितीनुसार नागपूरकडून येणारा सीजी ०७ सी एफ ५०३६ क्रमांकाचा ट्रक रस्त्यावर घसरला त्यामुळे मागून येणारा एमएच ४० सीडी ८३९० क्रमांकाचा समोरील ट्रकला धडकून समोरील इलेट्रिक डीपीला धडकला त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन डिपिने पेट घेतला. घटनेची माहिती माजी नगरसेवक मुजाहिद भाई व सुमित देशमुख यांनी तात्काळ श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली.Karnaja laad Accident देशमुख यांनी ही माहिती अग्निशमन दलाला देताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व तेथील आग विझवण्यात आली तसेच त्यांनी ट्रक मधील गंभीर अवस्थेत असलेल्या चालकाला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून माणुसकीचे दर्शन घडविले. यावेळी चालक चंदू खराडे, फायरमन आमद खान व शुभम झोपाटे यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी शहर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी व जय गुरुदेव रुग्णवाहिकेचे चे अविनाश भोयर मदतीसाठी उपस्थित होते. अपघाताच्या या घटनेमुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक देखील विस्कळीत झाली होती.