कालेश्‍वरात सरस्वती पुष्करांची जय्यत तयारी

21 Apr 2025 19:41:05
सिरोंचा,
Saraswati River Pushkar Festival सिरोंचा मुख्यालयापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्यातील महादेवपूर तालुक्यातील पवित्र तीर्थक्षेत्र कालेश्‍वर येथे यंदा सरस्वती नदी पुष्कर महोत्सव मोठ्या भक्तिभावाने व सरकारच्या विशेष सहभागाने साजरा होणार आहे. 15 ते 26 मे दरम्यान होणार्‍या या पुष्कर उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. स्वतंत्र तेलंगणा राज्य स्थापन झाल्यानंतर होणारा हा पहिला सरस्वती पुष्कर असल्याने सरकारने यास ‘प्रतिष्ठेचा’ दर्जा दिला आहे.
 
 
a
 
कालेश्‍वर हे भारतातील एकमेव असे स्थान आहे जिथे गोदावरी, प्राणहिता आणि सरस्वती या तीन नद्यांचा त्रिवेणी संगम होतो. या ठिकाणी प्रत्येक 12 वर्षांनी या तिन्ही नद्यांचे पुष्कर सोहळे वेगवेगळ्या वेळी साजरे होतात. 2013 मध्ये संयुक्त आंध्रप्रदेशात सरस्वती पुष्कर झाले होते आणि आता 2025 मध्ये स्वतंत्र तेलंगणातील पहिले सरस्वती पुष्कर साजरे होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर धार्मिक महत्त्व आणि प्रशासनिक जबाबदारी यांचा समतोल राखण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. राज्य सरकारने सुमारे 25 कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून दिला असून, या निधीमधून तब्बल 120 पेक्षा अधिक विकासकामे राबवली जात आहेत. Saraswati River Pushkar Festival यामध्ये तात्पुरत्या व दीर्घकालीन स्वरूपाच्या सोयी-सुविधांचा समावेश आहे. प्रमुख कामांमध्ये घाटांचे मजबुतीकरण, सिसी रस्ते, व्हिआयपी पार्किंग, प्रवासी निवास, प्रसाद केंद्र, पिण्याचे पाणी, शौचालये, वस्त्रपरिवर्तन कक्ष, वीज आणि स्वच्छतेची विशेष व्यवस्था यांचा समावेश आहे.
 
पुष्कराच्या पार्श्‍वभूमीवर त्रिवेणी संगमाजवळील मुख्य घाटावर 20 फूट उंच सरस्वती देवीची भव्य मूर्ती उभारली जात आहे. त्यासोबतच वेदाचार्यांच्या मूर्तीही स्थापण्यात येणार आहेत. Saraswati River Pushkar Festival या मूर्ती भाविकांचे विशेष आकर्षण ठरणार आहेत. तेलंगणा, महाराष्ट्र, आंध्रप्रदेशसह अन्य राज्यांमधून लाखो भाविक या काळात कालेश्‍वरात स्नानासाठी दाखल होण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0